व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परिशिष्ट

हस्तमैथुनाच्या सवयीवर विजय मिळवा

हस्तमैथुनाच्या सवयीवर विजय मिळवा

हस्तमैथुन ही देवाला नाराज करणारी सवय आहे. या सवयीमुळे एखादी व्यक्ती फक्त स्वतःचाच विचार करते व यामुळे मन भ्रष्ट होते. * हस्तमैथुन करणारी व्यक्ती कदाचित इतरांनाही उपभोग्य वस्तू समजेल; लैंगिक सुख मिळवण्याकरता असलेल्या वस्तू समजेल. सेक्स हे, दोन लोकांमध्ये एकमेकांवर असलेले प्रेम व्यक्त करणारे प्रतीक आहे असे हस्तमैथुन करणारी व्यक्ती समजत नाही तर सेक्स हे क्षणिक सुख देणारे किंवा लैंगिक तणावातून मुक्त करणारे कृत्य आहे असे समजते. परंतु ही मुक्ती फक्त तात्पुरती असते. खरे तर, “जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना” या गोष्टी मनातून काढून टाकण्याऐवजी हस्तमैथुनामुळे त्या गोष्टी करण्यास एक व्यक्ती प्रवृत्त होते.—कलस्सैकर ३:५.

प्रेषित पौलाने लिहिले: “प्रियजनहो, . . . देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.” (२ करिंथकर ७:१) बायबलमधील या शब्दांनुसार वागायला तुम्हाला जड जात असेल तर निराश होऊ नका. यहोवा ‘क्षमा’ करण्यास व तुम्हाला मदत द्यायला सदैव तयार आहे. (स्तोत्र ८६:५; लूक ११:९-१३) तुमचे मन खाते आणि अधूनमधून तुमच्या हातून ही वाईट गोष्ट घडत असते तरीपण ही सवय सोडून देण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात यावरून तुमची मनोवृत्ती चांगली आहे हे दिसून येते. शिवाय, “आपल्या मनापेक्षा देव थोर आहे; त्याला सर्व काही कळते,” ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. (१ योहान ३:२०) यहोवा फक्त आपल्या हातून घडणारी पापेच पाहत नाही तर तो आपले हृदय पाहतो. आपल्याला तो अगदी चांगल्या प्रकारे ओळखत असल्यामुळे, आपण दयेसाठी त्याला भीक मागतो तेव्हा तो आपली विनंती ऐकतो. त्यामुळे, देवाला नम्र व कळकळीने प्रार्थना करायचा कंटाळा करू नका. त्रासात असलेले एक मूल जसे आपल्या पित्याकडे अगदी हक्काने जाते तशी यहोवाला अगदी हक्काने प्रार्थना करा. तो नक्कीच तुम्हाला एक शुद्ध विवेक देईल. (स्तोत्र ५१:१-१२, १७; यशया १:१८) पण फक्त प्रार्थना करणेच पुरेसे नाही तर प्रार्थनेच्या अनुषंगाने तुम्ही आवश्यक ती पावले देखील उचलली पाहिजेत. जसे की, तुम्ही सर्व प्रकारची पोर्नोग्राफी पाहण्याचे तसेच वाईट लोकांबरोबर संगती करण्याचे कटाक्षाने टाळले पाहिजे. *

तुमची हस्तमैथुनाची सवय सुटत नसेल तर ख्रिस्ती असलेल्या तुमच्या पालकाबरोबर किंवा मंडळीतील एखाद्या प्रौढ व प्रेमळ मित्राबरोबर बोला. *नीतिसूत्रे १:८, ९; १ थेस्सलनीकाकर ५:१४; तीत २:३-५.

^ परि. 2 हस्तमैथुनाचा अर्थ लैंगिक अवयवांना सहसा वीर्यपात होईपर्यंत चोळत राहणे, असा होतो.

^ परि. 1 ज्यांच्या घरात कंप्युटर आहे ते विशिष्ट पावले उचलतात. ते तो कंप्युटर अशा ठिकाणी ठेवतात जेथे येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वांना स्क्रीनवर काय चालले आहे ते दिसते. एवढेच नव्हे तर काही कुटुंबांनी आपल्या कंप्युटरवर फिल्टर प्रोग्राम घेतले आहेत जेणेकरून नको असलेले साहित्य कंप्युटरवर दिसत नाही. पण, कोणताही प्रोग्राम पूर्णपणे भरवसालायक नाही.

^ परि. 3 हस्तुमैथुनाच्या सवयीवर मात करण्यास तुम्हाला व्यावहारिक सूचना पाहायच्या असतील तर सावध राहा! नोव्हेंबर २००६ “तरुण लोक विचारतात . . . मी या सवयीवर मात कशी करू शकतो?” हा इंग्रजीमधील लेख आणि तरुणांचे प्रश्नउपयुक्त उत्तरे, खंड १, या पुस्तकाची पृष्ठे २०५-११ पाहा.