गीत ३
“देव प्रीती आहे”
१. प्रेमाचे स्वरूप देव
प्रेमाने आम्हा सांगे,
‘बांधवां करुनी प्रीती,
व्हा माझी प्रिय मुले.’
दाखवू या सर्वां आपण
नित्य प्रेम याहाचे.
गूज हे खऱ्या सुखाचे,
गूज हे सफलतेचे!
२. प्रीती नम्र, नीतिवंत,
ती सारे सहन करी.
न हेवा करे कधीही,
तीच असे खरी प्रीती.
देवप्रीतीची अक्षरे
गिरवू अनुदिनी,
चुकलो नकळत तरी, तो
प्रेमाने पुन्हा शिकवी.
३. रागा द्वेषाची जळमटे
काढुनी मनातुनी,
प्रेमाचा सुगंध साऱ्या
दरवळावा जीवनी.
देवावर नि बांधवांवर
करुनी खरी प्रीती,
या निःस्वार्थ प्रीतीयोगे
ठरू या खरे ख्रिस्ती!
(मार्क १२:३०, ३१; १ करिंथ. १२:३१–१३:८; १ योहा. ३:२३ देखील पाहा.)