व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १०

“हा मी आहे, मला पाठीव!”

“हा मी आहे, मला पाठीव!”

(यशया ६:८)

१. याहाच्या थोर नावाला

पाहा, कलंक फासला,

‘नाहीच देव,’ म्हणती

दुराचारी, मूढ अती.

जाईल कोण सांगण्या,

कलंक हा मिटवण्या?

‘हा मी प्रभू, पाठीव मला,

गाईन महिमा तुझा.

(कोरस)

नाही दुजा सन्मान मोठा!

मी जाईन, पाठीव मला!’

२. विलंब लावी म्हणुनी

देती देवा दोष कुणी.

हातांनी मूर्ती घडती,

देशासही ते पूजती.

जाईल कोण सांगण्या,

दुष्टां सावध करण्या?

‘हा मी प्रभू, पाठीव मला,

सांगेन मी धैर्याने त्यां.

(कोरस)

नाही दुजा सन्मान मोठा!

मी जाईन, पाठीव मला!’

३. दुष्टांचा पाहुनी सुकाळ

मने सज्जनांची घायाळ,

त्यां वेदना जरी होती

खऱ्‍या देवा ते शोधती.

जाईल कोण सांगण्या,

फुंकर प्रेमाने घालण्या?

‘हा मी प्रभू, पाठीव मला,

जाईन त्यांच्या सांत्वना.

(कोरस)

नाही दुजा सन्मान मोठा!

मी जाईन, पाठीव मला!’

(स्तो. १०:४; यहे. ९:४ देखील पाहा.)