व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १४

सर्व काही नवे झाले!

सर्व काही नवे झाले!

(प्रकटीकरण २१:१५)

१. प्रतीक्षेचा काळ गेला संपुनी,

विराजला येशू राजासनी!

सैतानास मात दिली स्वर्गी,

आणील सुकाळ धरेवरती.

(कोरस)

आले उधाण आनंदा,

झाला वर्षाव कृपेचा!

सारी दुःखे वाहुनी जाती,

मरणाही मिळे मूठमाती!

‘पहा,’ वचन दिले याहाने,

‘करेन सारे नवे!’

२. लावण्यवती यरूश्‍लेम नवी,

ख्रिस्ताची वधू पहा तेजस्वी!

पवित्र प्रभा तिने पांघरली,

तेजाने याहाच्या प्रकाशली.

(कोरस)

आले उधाण आनंदा,

झाला वर्षाव कृपेचा!

सारी दुःखे वाहुनी जाती,

मरणाही मिळे मूठमाती!

‘पहा,’ वचन दिले याहाने,

‘करेन सारे नवे!’

३. यरूश्‍लेम नवी स्वर्गातील नगरी,

प्रकाशील सर्व लोकांवरी.

तेजोमय ही सत्ये आनंदाची,

चला, जाउनी गाजवू जगी!

(कोरस)

आले उधाण आनंदा,

झाला वर्षाव कृपेचा!

सारी दुःखे वाहुनी जाती,

मरणाही मिळे मूठमाती!

‘पहा,’ वचन दिले याहाने,

‘करेन सारे नवे!’