व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत २२

“यहोवा माझा मेंढपाळ”

“यहोवा माझा मेंढपाळ”

(स्तोत्र २३)

१. यहोवा मेंढपाळ माझा,

कोणाची भीती मला?

सांभाळी जो त्याच्या मेंढरां,

सोडील का तो मला?

निवांत पाण्याशी नेई,

जिवा देई ताजवा,

नीतीच्या वाटेने चालवी,

दिशा देई पावलां.

नीतीच्या वाटेने चालवी,

दिशा देई पावलां.

२. जरी काळोख्या दरीतून

मी चाललो एकटा,

असे याह माझ्या संगती

का भ्यावे मी संकटां?

नाही होणार मी व्याकूळ

तो भागवितो क्षुधा,

वाही ओसंडुनी हर्षाने,

तृप्तीने माझा प्याला!

वाही ओसंडुनी हर्षाने,

तृप्तीने माझा प्याला!

३. सुजाण मेंढपाळ माझा,

वात्सल्य त्याचे अपार!

सांगेन आनंदाने मी सर्वां,

यहोवा किती उदार!

चालेन आजन्म नेमाने

मी सत्य पथावरी,

राहो यहोवाची सावली

माझ्या जीवनावरी!

राहो यहोवाची सावली

माझ्या जीवनावरी!

(स्तो. २८:९; ८०:१ देखील पाहा.)