व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत २४

ध्येय डोळ्यांपुढे ठेवा!

ध्येय डोळ्यांपुढे ठेवा!

(२ करिंथकर ४:१८)

१. ज्योती परतेल नेत्रांची,

गाईल स्तुती जिव्हा मुकी.

नव्याने सूर स्पर्शता

सुखावतील बधिर कानां.

पायांत नाही त्राण ज्यां,

आतुरतील धावण्या

स्वतः पाहू नंदनवनी,

ध्येया ठेवता लोचनी.

२. वैराण वाळवंटातुनी

वाहील खळाळुनी पाणी.

सारी धरा ही मोहरेल,

गिरीमाथीही पीक डोलेल.

खेळेल मूल तान्हेसे

सिंहासंगे निर्भयपणे.

स्वतः पाहू नंदनवनी,

ध्येया ठेवता लोचनी.

३. होईल वृद्ध कायाही

कोमल नवी बाल्यापरी.

गेले निजुनी प्रिय जे,

पुन्हा घेतील श्‍वास ते.

हे आशीर्वाद याहाचे

विपुल, सर्वकाळाचे,

आम्हा मिळतील नंदनवनी,

ध्येया ठेवता लोचनी.