गीत ५५
चिरकालाचे जीवन!
१. याहाने केली कृपा,
आले पर्व सुखाचे.
दुःखे सारी लोपली,
हसे वसुंधरा.
(कोरस)
जीवन चिरकालाचे
नूतन धरतीचे,
विश्वासाच्या नेत्रांनी
पाहतो चित्र हे.
२. कोवळी, बालकांची,
वृद्धां लाभली काया.
मृत्यू ना क्लेश, ना लवलेश
भीतीचा राहिला.
(कोरस)
जीवन चिरकालाचे
नूतन धरतीचे,
विश्वासाच्या नेत्रांनी
पाहतो चित्र हे.
३. ऐक्याने, हर्षभरे
नांदती पहा सारे,
निसदिनी, मानुनी
आभार याहाचे.
(कोरस)
जीवन चिरकालाचे
नूतन धरतीचे,
विश्वासाच्या नेत्रांनी
पाहतो चित्र हे.
(ईयो. ३३:२५; स्तो. ७२:७; प्रकटी. २१:४ देखील पाहा.)