व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ३२

निर्भय व निश्‍चयी राहा!

निर्भय व निश्‍चयी राहा!

(१ करिंथकर १५:५८)

१. ग्रासिले भीतीने लोकां जगी,

भावी काळाची चिंता त्यां छळी.

राहुनी आपण निर्भय, निश्‍चयी,

चालू याहासोबती.

(कोरस)

राहू निर्भय, निश्‍चयी,

अंताच्या या समयी,

नाकारुनी जगा, सत्या कवटाळुनी.

२. रंग मनमोहक दुन्येचे किती!

आठव ठेवू सदा हा मनी,

ऐकता वाणी यहोवाची, तो

वाचवील पाशांतुनी.

(कोरस)

राहू निर्भय, निश्‍चयी,

अंताच्या या समयी,

नाकारुनी जगा, सत्या कवटाळुनी.

३. होउनी कष्टाळू कामकरी,

याहाची सेवा करू या पुरी.

राबू या कापणीत आवेशाने,

येतील दिन सौख्याचे!

(कोरस)

राहू निर्भय, निश्‍चयी,

अंताच्या या समयी,

नाकारुनी जगा, सत्या कवटाळुनी.

(लूक २१:९; १ पेत्र ४:७ देखील पाहा.)