व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ४

देवाच्या लेखी चांगले नाव मिळवणे

देवाच्या लेखी चांगले नाव मिळवणे

(उपदेशक ७:१)

१. देवाच्या लेखी मिळावे नाव भले,

सोन्यारुप्याहून जे मौल्यवान असे.

मिळविता हे धन, करिता ते जतन,

सार्थकी लागे आमचे जीवन.

२. नको आम्हाला मैत्री जगाची या,

नको प्रसिद्धी, नको ती व्यर्थता.

विनवू सर्वदा, आम्ही यहोवाला,

‘राहो आम्हावर तुझी कृपा!’

३. आठव राहो देवाला आमचा,

ग्रंथात त्याच्या उल्लेख नावाचा.

सत्या कवटाळुनी राहू रात्रंदिनी,

सर्वस्व वाहून झटू आम्ही.