गीत ३५
देवाच्या धीराबद्दल कृतज्ञता
१. देवा याहा, तू सामर्थ्यवान,
न्यायप्रेमी, तू नीतिमान!
वाढती आज दुराचारी
सर्व जगी तृणापरी.
पाहुनी वाटे खेद तुला,
धीर तरीही तू धरिला.
लोक म्हणो विलंब या,
आम्हा कळे ही थोर दया.
२. वर्षे हजार याहा तुला,
दिन जणू एक मावळला.
येईल त्वरेने दिन तुझा,
अंत करील अनीतीचा.
पापी जना होता अनुताप,
वाटे तुला आनंद अमाप.
वाखाणितो याहा तुला,
आजवरी तू धीर धरिला!
(लूक १५:७; २ पेत्र ३:८, ९ देखील पाहा.)