व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ४२

“दुर्बळांना साहाय्य करावे”

“दुर्बळांना साहाय्य करावे”

(प्रेषितांची कृत्ये २०:३५)

१. एकही ज्यात दोष ना,

आहे कोण असा?

केली देवाने तरी,

आभाळमाया.

मेघ कृपेचा तो,

प्रीती वर्षवितो.

द्यावे आम्हीही तसे

प्रेम दुर्बळां.

२. लेकरे यहोवाची

सारी प्रिय त्यास.

सर्वांसाठी वाहिले

त्याने एकुलत्यास.

आसू प्रत्येकाचा,

तो लेखी मोलाचा.

लागो बांधवांचे घाव

आमच्याही मनास.

३. कंठताना जीवन

या दुष्ट जगी,

बांधव कितीतरी

ओझी वाहती.

वाहू या त्यांचा भार,

देऊ त्यांना आधार,

दाखवू या दुर्बळां

देवाची प्रीती.