व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ४४

कापणीत आनंदाने सहभागी व्हा!

कापणीत आनंदाने सहभागी व्हा!

(मत्तय १३:१-२३)

१. सुगीचा समय आनंदाचा

करू कापणी हर्षाने!

अनमोल प्रत्येकाचा जीव

यहोवा देवाला वाटे.

चालू येशूच्या पावलांवर

करू कार्य आवेशाने!

सत्याचे बी पेरू मनामनात,

नि वाढवू त्या प्रेमाने.

२. समय नेटाने राबण्याचा,

विश्रांतीची ना वेळ ही!

दिवस याहाचा समीप,

येई चोरपावलांनी.

देवाचे आम्ही सहकारी,

आधार त्याच्या दूतांचा,

सन्मान आम्हा मोठा लाभला,

जपू हा ठेवा मोलाचा!