व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ४७

सुवार्ता घोषित करा!

सुवार्ता घोषित करा!

(प्रकटीकरण १४:६, ७)

१. चोहीकडे जी घोषितो सुवार्ता आज,

ते गूज होते संततीचे पडद्याआड.

व्यथा पाहुनी मानवाची याहाने,

केला संकल्प एदेनात प्रेमाने.

पृथ्वीवरील दुःख करण्या नाहीसे,

पुत्रास आपुल्या यहोवाने नेमिले.

देउनी स्वर्गी राजासन त्या गौरवी,

दिली यहोवाने वधूही साजरी.

२. हे राज्य याहाच्या नावास गौरवील,

सर्वांना सांगू तेच मानवां तारील!

साहाय्य करितात देवदूत आम्हा,

प्रकाशिण्या याहाच्या थोर कृत्यांना.

सन्मान मोठा याहाने आम्हा दिला,

याहाचे साक्षीदार लाभले नाव आम्हा!

चला वाखाणू नाव त्याचे भूवरी,

तो साऱ्‍या सृष्टीचा नियंता वैभवी!