व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ४९

यहोवा आमचा दुर्ग!

यहोवा आमचा दुर्ग!

(स्तोत्र ९१)

१. यहोवा दुर्ग आमचा,

देई शरण आम्हा.

छायेत राहू त्याच्या,

रक्षील तो आम्हा.

ठेवू भाव याहावरी,

त्याच्या थोर नावावरी.

होई तो पाठीराखा,

नीतिवंतांचा आसरा.

२. पडोत जन सहस्र,

जरी सभोवती,

राहू या एकनिष्ठ

याहास जडुनी.

अरिष्टांची नसे भीती,

असे यहोवा सोबती.

तारील तोच आम्हा,

राहू त्यावर विसंबुनी.

३. यहोवा दुर्ग आमचा,

तो राखितो जिवा.

पाशांतून पारध्याच्या,

तो सोडवी आम्हा.

सिंहांची वाटे ना भीती,

सर्पांना टाकू चिरडुनी.

यहोवा ढाल ज्याची,

ना कोणाचेही भय त्या!