व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलमधील संदेशाचा—सारांश

बायबलमधील संदेशाचा—सारांश
  1. यहोवा देव आदाम व हव्वेला नंदनवनात सर्वकाळ जगण्याच्या उद्देशाने निर्माण करतो. सैतान देवावर दोषारोप लावतो आणि देवाच्या आधिपत्यासंबंधी सवाल उपस्थित करतो. आदाम आणि हव्वा देखील सैतानासोबत मिळून देवाविरुद्ध बंड करतात. परिणामस्वरूप, ते स्वतःवर आणि आपल्या वंशजांवर पाप आणि मृत्यू ओढवतात.

  2. यहोवा बंड करणाऱ्‍यांना शिक्षा सुनावतो आणि असे वचन देतो की एक संतती किंवा मुक्‍तिदाता येईल, जो सैतानाला चिरडून टाकेल आणि देवाविरुद्ध केलेल्या बंडामुळे व पापामुळे उद्‌भवलेले सर्व दुष्परिणाम नाहीसे करेल.

  3. यहोवा अब्राहामाला व दाविदाला वचन देतो, की प्रतिज्ञात संतती किंवा सर्वकाळ राज्य करणारा मशीहा त्यांच्या वंशातून येईल.

  4. यहोवा आपल्या संदेष्ट्यांद्वारे असे भाकीत करतो की येणारा मशीहा पाप व मृत्यूपासून मानवजातीची सुटका करेल. देवाच्या राज्याचा राजा या नात्याने मशीहा आपल्या सहराजांसोबत राज्य करेल. आणि हे राज्य युद्धे, रोगराई आणि मृत्यू देखील नाहीसा करेल.

  5. यहोवा आपल्या पुत्राला पृथ्वीवर पाठवतो आणि येशू हाच मशीहा असल्याची ग्वाही देतो. येशू देवाच्या राज्याचा प्रचार करतो व शेवटी आपल्या जीवनाचे बलिदान देतो. मग, यहोवा आत्मिक शरीरात त्याचे पुनरुत्थान करतो.

  6. यहोवा स्वर्गात आपल्या पुत्राला राजा बनवतो व तेव्हापासून सध्याच्या जगाचा शेवटला काळ सुरू होतो. पृथ्वीवरील येशूचे अनुयायी जगभरात देवाच्या राज्याचा प्रचार करत असता येशू त्यांचे मार्गदर्शन करतो.

  7. यहोवा पृथ्वीवर आपले राज्य स्थापन करण्याची येशूला आज्ञा देतो. हे राज्य सर्व भ्रष्ट सरकारांचा समूळ नाश करते, पृथ्वीचे नंदनवनात रूपांतर करते आणि विश्‍वासू मानवांना पुन्हा एकदा परिपूर्ण बनवते. मानवजातीवर आधिपत्य करण्यास केवळ यहोवालाच अधिकार आहे हे कायमचे सिद्ध केले जाते आणि त्याच्या नावावरील कलंक दूर होऊन ते सदासर्वकाळ पवित्र ठरते.