व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ६

नोहाच्या दिवसांत आलेल्या महापुरावरून आपण काय शिकतो?

नोहाच्या दिवसांत आलेल्या महापुरावरून आपण काय शिकतो?

देवाने दुष्टांचा नाश केला, पण नोहाला आणि त्याच्या कुटुंबाला वाचवलं. उत्पत्ती ७:११, १२, २३

पृथ्वीवर ४० दिवस आणि ४० रात्र पाऊस पडला आणि संपूर्ण पृथ्वीवर महापूर आला. त्यात सगळे दुष्ट लोक मेले.

दुष्ट स्वर्गदूत मानवी शरीर सोडून परत गेले.

नोहा आणि त्याचं कुटुंब जहाजात असल्यामुळे ते वाचलं. पुढे बऱ्‍याच वर्षांनंतर त्यांचा मृत्यू झाला. पण देव त्यांना पुन्हा जिवंत करणार आहे आणि मग ते कायम पृथ्वीवर राहू शकतील.

देव पुन्हा एकदा दुष्टांचा नाश करून चांगल्या लोकांना वाचवणार आहे. मत्तय २४:३७-३९

सैतान आणि त्याला साथ देणारे दुष्ट स्वर्गदूत आजही लोकांना फसवत आहेत.

आज यहोवा लोकांना प्रेमळपणे शिकवतो. पण नोहाच्या दिवसांप्रमाणेच आजही बरेच लोक त्याचं ऐकत नाहीत. लवकरच यहोवा अशा सगळ्या दुष्ट लोकांचा नाश करेल.—२ पेत्र २:५, ६.

यहोवाचे साक्षीदार नोहासारखं वागायचा प्रयत्न करतात. ते देवाचं ऐकतात आणि त्याने सांगितल्याप्रमाणे वागतात.