व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ७

येशू कोण होता?

येशू कोण होता?

यहोवाने येशूला पृथ्वीवर पाठवलं. १ योहान ४:९

आपल्याला जर यहोवाचं मन आनंदित करायचं असेल तर आपण आणखी एका महत्त्वाच्या व्यक्‍तीचं ऐकलं पाहिजे. आदामला निर्माण करायच्या बऱ्‍याच काळाआधी यहोवाने स्वर्गात एका शक्‍तिशाली स्वर्गदूताला निर्माण केलं होतं.

पुढे बऱ्‍याच वर्षांनंतर यहोवाने त्या स्वर्गदूताला बेथलेहेममध्ये मरीया नावाच्या एका कुमारीच्या पोटी जन्माला घातलं. तिने आपल्या मुलाचं नाव येशू ठेवलं.—योहान ६:३८.

पृथ्वीवर असताना येशूच्या वागण्यातून लोकांना देवाचे गुण स्पष्टपणे दिसून आले. तो दयाळू आणि प्रेमळ होता. लोक त्याच्याजवळ जायला, त्याच्याशी बोलायला घाबरत नव्हते. त्याने न घाबरता लोकांना यहोवाबद्दल खरी माहिती दिली.

येशूने पुष्कळ चांगली कामं केली, तरी लोकांनी त्याचा द्वेष केला. १ पेत्र २:२१-२४

त्या काळातले धर्मपुढारी येशूचा द्वेष करायचे. कारण तो त्यांच्या खोट्या शिकवणींबद्दल आणि दुष्ट कामांबद्दल लोकांना उघडपणे सांगायचा.

येशूने लोकांचे आजार बरे केले आणि काही मेलेल्या लोकांनाही जिवंत केलं.

धर्मपुढाऱ्‍यांनी रोमी अधिकाऱ्‍यांना येशूचा छळ करायला आणि त्याला ठार मारायला भडकावलं.