व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ८

येशूच्या मृत्यूमुळे तुम्हाला काय फायदा होतो?

येशूच्या मृत्यूमुळे तुम्हाला काय फायदा होतो?

आपल्याला जीवन मिळावं म्हणून येशू मेला. योहान ३:१६

येशूच्या मृत्यूच्या तीन दिवसांनंतर काही स्त्रिया त्याच्या कबरेजवळ आल्या. त्यांना ती कबर रिकामी दिसली. कारण यहोवाने येशूला पुन्हा जिवंत केलं होतं.

नंतर येशू त्याच्या प्रेषितांना दिसला.

यहोवाने येशूला पुन्हा जिवंत केलं, तेव्हा त्याने त्याला माणसांसारखं शरीर दिलं नाही. तर त्याने त्याला स्वर्गदूतांसारखं अदृश्‍य शरीर दिलं. काही दिवसांनी येशू स्वर्गात परत गेला. त्याच्या शिष्यांनी त्याला स्वर्गात जात असताना पाहिलं. आता येशू कधीच मरणार नाही.

देवाने येशूला पुन्हा जिवंत करून त्याला आपल्या राज्याचा राजा बनवलं. दानीएल ७:१३, १४

मानवजातीला पापाच्या गुलामीतून सोडवण्यासाठी किंमत किंवा खंडणी म्हणून येशूने त्याचं जीवन अर्पण केलं. (मत्तय २०:२८) या खंडणीमुळेच देव आपल्याला कायमचं जीवन देणार आहे.

संपूर्ण पृथ्वीवर राज्य करण्यासाठी यहोवाने येशूला राजा म्हणून नेमलं. येशूसोबत १,४४,००० विश्‍वासू लोक राजे म्हणून राज्य करतील. जेव्हा त्यांचा पृथ्वीवर मृत्यू होतो, तेव्हा त्यांना स्वर्गात पुन्हा जिवंत केलं जातं. येशू आणि १,४४,००० जणांचं मिळून स्वर्गात एक सरकार असेल. ते न्याय-नीतीने राज्य करेल. हे सरकार म्हणजेच देवाचं राज्य.—प्रकटीकरण १४:१-३.

देवाच्या राज्यात ही पृथ्वी एक सुंदर नंदनवन बनेल. त्या राज्यात युद्ध, गुन्हेगारी आणि गरिबी राहणार नाही. कोणालाही उपाशी राहावं लागणार नाही. सगळे लोक खूप आनंदी असतील.—स्तोत्र १४५:१६.