व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाची इच्छा काय आहे?

देवाची इच्छा काय आहे?

देवाची अशी इच्छा आहे की पृथ्वीवरील नंदनवनात सर्वांनी नेहमीसाठी शांतीने व आनंदाने राहावे!

पण तुम्ही विचार कराल की ‘हे शक्य तरी आहे का?’ होय. देवाच्या राज्याद्वारे हे शक्य होईल आणि या राज्याबद्दल व आपल्याबद्दल असलेल्या त्याच्या उद्देशांविषयी सर्वांनी शिकावे अशी देवाची इच्छा असल्याचे बायबल आपल्याला सांगते.—स्तोत्र ३७:११, २९; यशया ९:७.

देवाची आज्ञा मानून आपण लाभ मिळवावा अशी त्याची इच्छा आहे.

ज्याप्रमाणे एका प्रेमळ पित्याची इच्छा असते की आपल्या मुलांचे नेहमी भले व्हावे त्याप्रमाणेच आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे की आपण सर्वांनी नेहमी आनंदी राहावे. (यशया ४८:१७, १८) त्याने आपल्याला आश्वासन दिले आहे की त्याच्या “इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहील.”—१ योहान २:१७.

देवाची इच्छा आहे की आपण त्याने दाखवलेल्या मार्गात चालावे.

बायबल म्हणते की आपला सृष्टीकर्ता आपल्याला त्याचे “मार्ग शिकवू” इच्छितो जेणेकरून आपण “त्याच्या पथांनी चालू” शकू. (यशया २:२, ३) त्याने त्याची इच्छा काय आहे हे जगभरात सांगण्यासाठी त्याच्या “नावाकरता काही लोक” निवडले आहेत.—प्रेषितांची कृत्ये १५:१४.

आपण सर्वांनी एकत्र मिळून त्याची उपासना करावी अशी देवाची इच्छा आहे.

लोकांना तोडण्याऐवजी यहोवाची शुद्ध उपासना त्यांना मनस्वी प्रेमात जोडते. (योहान १३:३५) आज जगभरात लोकांना देवाची उपासना एकतेने करण्यास कोण शिकवत आहेत? या माहितीपत्रकाद्वारे या प्रश्‍नाचे उत्तर मिळवण्यास आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देतो.