व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ६

ख्रिस्ती बंधुभगिनींसोबत सहवास केल्यामुळे आम्हाला कोणता फायदा होतो?

ख्रिस्ती बंधुभगिनींसोबत सहवास केल्यामुळे आम्हाला कोणता फायदा होतो?

मादागास्कर

नॉर्वे

लेबनान

इटली

आम्ही नियमितपणे आमच्या ख्रिस्ती सभांना उपस्थित राहतो, मग त्यासाठी आम्हाला दाट जंगलातून प्रवास करावा लागला किंवा हवामान अतिशय वाईट असले तरीही. जीवनात अनेक समस्या असूनही आणि दिवसभर काम करून दमल्यानंतरही यहोवाचे साक्षीदार त्यांच्या ख्रिस्ती बंधुभगिनींसोबत सहवास करण्याचा इतका प्रयत्न का करतात?

कारण ते आमच्या हितासाठी आहे. ख्रिस्ती मंडळीत आम्ही ज्यांच्यासोबत सहवास करतो अशांविषयी बोलताना पौलाने म्हटले, “एकमेकांकडे लक्ष” द्या. (इब्री लोकांस १०:२४) या वाक्यांशाचा अर्थ, इतरांचा “काळजीपूर्वक विचार करणे” असा होतो. तर मग, प्रेषित पौलाचे हे शब्द आम्हाला एकमेकांची काळजी करण्याचे उत्तेजन देतात. आपण मंडळीतील इतर ख्रिस्ती बंधुभगिनींना जाणून घेतो तेव्हा आपल्या लक्षात येईल, की जीवनात आपल्याला ज्या समस्यांचा सामना करावा लागतो त्याच समस्यांवर त्यांच्यापैकी काहींनी यशस्वीपणे मात केली आहे आणि त्यामुळे ते आपल्यालाही आपल्या समस्यांवर मात करण्यास मदत करू शकतात.

कारण त्यामुळे दृढ मैत्रीसंबंध जोडले जातात. आमच्या ख्रिस्ती सभांमध्ये एकत्र येणाऱ्यांशी आमची केवळ तोंडओळख नसते, तर ते आमचे जवळचे मित्र असतात. अशा जिवलग मित्रांच्या सहवासात आम्ही हितकारक करमणुकीत वेळ घालवतो. अशा सहवासाचा कोणता चांगला फायदा होतो? आम्ही एकमेकांची कदर करायला शिकतो आणि त्यामुळे आमच्यातील प्रेमाचे बंधन आणखी मजबूत होते. तसेच, आमचे सोबती असलेले हे बंधुभगिनी जीवनात काही समस्यांचा सामना करतात तेव्हा आम्ही त्यांच्या मदतीला धावून जातो, कारण आमच्यात दाट मैत्री निर्माण झालेली असते. (नीतिसूत्रे १७:१७) आपण मंडळीतील सर्व लोकांशी सहवास करतो तेव्हा आपण दाखवून देतो की आपण “एकमेकांची सारखीच काळजी” करतो.—१ करिंथकर १२:२५, २६.

आम्ही तुम्हाला उत्तेजन देतो की जे देवाच्या इच्छेनुसार जीवन जगतात अशा लोकांशी तुम्ही मैत्री करावी. असे मित्र तुम्हाला यहोवाच्या साक्षीदारांमध्ये सापडतील. तेव्हा, आमच्यासोबत सहवास राखण्यापासून कोणत्याही गोष्टीला आड येऊ देऊ नका.

  • सभांमध्ये एकमेकांशी सहवास करणे हे आपल्या हिताचे का आहे?

  • अशा सहवासाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आमच्या सभेला यायला आवडेल का?