व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ७

आमच्या सभा कशा चालवल्या जातात?

आमच्या सभा कशा चालवल्या जातात?

न्यूझीलंड

जपान

युगांडा

लिथुएनिया

पहिल्या शतकातील ख्रिस्ती सभांमध्ये कोणतेही धर्मविधी समाविष्ट नव्हते. त्या सभांमध्ये प्रामुख्याने गीते गायिली जायची, प्रार्थना केल्या जायच्या आणि शास्त्रवचनांचे वाचन करून त्यांवर चर्चा केली जायची. (१ करिंथकर १४:२६) आमच्या ख्रिस्ती सभादेखील अशाच स्वरूपाच्या आहेत.

तेथे दिले जाणारे शिक्षण बायबलवर आधारित असून ते व्यावहारिक असते. प्रत्येक मंडळीत दर शनिवारी किंवा रविवारी ३० मिनिटांचे बायबलवर आधारित भाषण दिले जाते. शास्त्रवचने आपल्या जीवनाबद्दल व आपल्या काळाबद्दल काय सांगतात हे या भाषणात सांगितले जाते. उपस्थित असलेल्या सर्वांना आपापल्या बायबलमधून शास्त्रवचने पडताळून पाहण्याचे उत्तेजन दिले जाते. भाषणानंतर एक तासाचा “टेहळणी बुरूज” अभ्यास असतो. यात टेहळणी बुरूज अभ्यास आवृत्तीतील एका लेखाची प्रश्नोत्तरांनी चर्चा केली जाते व मंडळीतील सर्व सदस्ये या चर्चेत सहभाग घेऊ शकतात. अशा प्रकारच्या चर्चेमुळे आम्हाला बायबलची तत्त्वे जीवनात लागू करण्यास मदत मिळते. जगभरातील १,१०,००० हून अधिक ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये एकाच विषयाचा अभ्यास केला जातो.

आम्हाला आमची शिकवण्याची कला सुधारण्यास मदत मिळते. वर उल्लेखित सभेव्यतिरिक्त आठवड्यातील आणखी एक दिवस आम्ही सभेसाठी एकत्र येतो. ही सभा तीन भागांची असते. या सभेत पहिली ३० मिनिटे मंडळीचा बायबल अभ्यास केला जातो. प्रश्नोत्तरांनी हाताळल्या जाणाऱ्या या भागामुळे बायबलच्या तत्त्वांची व बायबलच्या भविष्यवाण्यांची आमची समज आणखी गहन होते. त्यानंतर, ३० मिनिटांची ईश्वरशासित सेवा प्रशाला असते. यात सुरुवातीला बायबलच्या एका विशिष्ट भागाची चर्चा केली जाते. मंडळीतील सदस्ये बायबलचा हा भाग आधीच वाचून आलेले असतात. मग, ज्या विद्यार्थ्यांची नावे प्रशालेत नोंदवलेली असतात ते संक्षिप्त भाषणे देतात. विद्यार्थ्यांनी आपापली भाषणे कशी सादर केली याचे एक सल्लागार निरीक्षण करतो आणि आम्हाला आमचे वाचनाचे व बोलण्याचे कौशल्य वाढवण्यास मदत करतो. (१ तीमथ्य ४:१३) शेवटी, ३० मिनिटांची सेवा सभा असते. या सभेत भाषणे, सादरीकरणे आणि मुलाखती यांचा समावेश असतो आणि यामुळे इतरांना बायबलचे शिक्षण कसे द्यावे हे आम्हाला शिकायला मिळते.

तुम्ही आमच्या सभेला उपस्थित राहिलात तर तेथे बायबलचे किती उच्च प्रतीचे ज्ञान मिळते हे पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.—यशया ५४:१३.

  • यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांमध्ये तुम्हाला काय ऐकायला मिळेल?

  • आमच्या पुढील साप्ताहिक सभांपैकी कोणत्या सभेला तुम्ही उपस्थित राहू इच्छिता?