व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ १०

कौटुंबिक उपासना म्हणजे काय?

कौटुंबिक उपासना म्हणजे काय?

दक्षिण कोरिया

ब्राझील

ऑस्ट्रेलिया

गिनी

सुरुवातीपासूनच यहोवाची अशी इच्छा होती की प्रत्येक कुटुंबाने एकत्र येऊन वेळ घालवावा, ज्यामुळे त्यांचे त्याच्यासोबतचे व कुटुंबात एकमेकांसोबतचे नाते मजबूत होईल. (अनुवाद ६:६, ७) त्यामुळेच यहोवाचे साक्षीदार दर आठवडी काही वेळ कौटुंबिक उपासना करण्यासाठी राखून ठेवतात. तेथे ते एका निवांत वातावरणात कुटुंबाच्या गरजेनुसार आध्यात्मिक गोष्टींविषयी चर्चा करतात. तुम्ही एकटे राहत असला तरीही तुम्ही हा वेळ देवाच्या वचनावर आधारित एखाद्या आवडत्या प्रकल्पावर घालवून देवाच्या आणखी जवळ येऊ शकता.

यहोवाच्या आणखी जवळ येण्याची वेळ. “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.” (याकोब ४:८) देवाच्या वचनातून आपण जेव्हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि त्याच्या कृत्यांबद्दल शिकतो तेव्हा आपण त्याला आणखी जवळून ओळखू लागतो. कौटुंबिक उपासना सुरू करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे एकत्र मिळून थोडा वेळ बायबलचे वाचन करणे; तुम्ही कदाचित ईश्वरशासित सेवा प्रशालेतील साप्ताहिक बायबल वाचन करू शकता. तुम्ही कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वाचनाचा एक भाग नेमून देऊ शकता आणि यातून काय शिकायला मिळाले याची सर्व जण मिळून चर्चा करू शकता.

कुटुंबात एकमेकांच्या जवळ येण्याची वेळ. बायबलचा अभ्यास करण्यासाठी पती-पत्नी तसेच पालक आणि मुले एकत्र येतात तेव्हा त्यांच्यातील नाते आणखी मजबूत होते. कौटुंबिक उपासनेची ही वेळ नेहमी आनंददायक व उत्तेजनात्मक असावी जेणेकरून कौटुंबिक उपासना प्रत्येकाला हवीहवीशी वाटेल. मुलांच्या वयानुसार पालक व्यावहारिक विषय निवडू शकतात. त्यासाठी पालक टेहळणी बुरूज नियतकालिकातील किंवा jw.org या आमच्या वेबसाईटवरील विशिष्ट सदरांचा उपयोग करू शकतात. मुलांना शाळेत एखादी समस्या आली असेल तर त्याविषयी तुम्ही बोलू शकता व ती कशी हाताळता येईल यावर चर्चा करू शकता. तुम्ही आठवड्यातील सभेमध्ये गाणार असलेल्या गीतांचा सराव करू शकता आणि कुटुंब मिळून काही खाद्यपदार्थांचा आस्वादही घेऊ शकता.

कुटुंब मिळून यहोवाच्या उपासनेत घालवलेल्या या वेळेमुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यात आनंद मिळेल आणि देव तुमच्या प्रयत्नांवर नक्कीच आशीर्वाद देईल.—स्तोत्र १:१-३.

  • आम्ही कौटुंबिक उपासनेसाठी वेळ का राखून ठेवतो?

  • पालक कौटुंबिक उपासनेची वेळ कुटुंबातील सर्वांसाठी आनंददायक कशी बनवू शकतात?