व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ १२

आमच्या साक्षकार्याचे आयोजन कशा प्रकारे केले जाते?

आमच्या साक्षकार्याचे आयोजन कशा प्रकारे केले जाते?

स्पेन

बेलारूस

हाँगकाँग

पेरू

येशूने आपल्या मृत्यूच्या काही दिवसांआधी असे म्हटले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) पण हे साक्षकार्य जागतिक पातळीवर कसे केले जाणार होते? येशू पृथ्वीवर असताना त्याने जो कित्ता घालून दिला त्याचे अनुकरण करण्याद्वारे.—लूक ८:१.

आम्ही लोकांना त्यांच्या घरी जाऊन भेटतो. येशूने त्याच्या शिष्यांना घरोघरी जाऊन साक्ष देण्याचे प्रशिक्षण दिले. (मत्तय १०:११-१३; प्रेषितांची कृत्ये ५:४२; २०:२०) पहिल्या शतकातील त्या सुवार्तिकांना प्रचार करण्यासाठी विशिष्ट क्षेत्र नेमून देण्यात आले होते. (मत्तय १०:५, ६; २ करिंथकर १०:१३) त्याचप्रमाणे आज आमच्या साक्षकार्याचे उत्तम आयोजन केले जाते आणि प्रत्येक मंडळीला साक्षकार्यासाठी एक विशिष्ट क्षेत्र नेमून दिले जाते. या पद्धतीमुळे, “लोकांस उपदेश करा व अशी साक्ष द्या,” ही येशूने दिलेली आज्ञा आम्हाला पूर्ण करता येते.—प्रेषितांची कृत्ये १०:४२.

जेथे कोठे लोक भेटतील तेथे त्यांना भेटण्याचा आम्ही प्रयत्न करतो. येशूने सार्वजनिक ठिकाणी, जसे की समुद्र किनाऱ्यावर किंवा विहिरीजवळ साक्ष देऊन आमच्यासाठी एक चांगले उदाहरण मांडले. (मार्क ४:१; योहान ४:५-१५) आम्हीसुद्धा जेथे कोठे लोक भेटतात तेथे म्हणजे रस्त्यावर, व्यापारी क्षेत्रात, बागेत किंवा फोनवर लोकांशी बायबलबद्दल बोलायचा प्रयत्न करतो. तसेच, योग्य संधी मिळाल्यास आम्ही आमच्या शेजाऱ्यांना, कामाच्या ठिकाणी, वर्गसोबत्यांना आणि नातेवाइकांनाही साक्ष देतो. या सर्व प्रयत्नांमुळे आज पृथ्वीवरील लाखो लोकांना “तारणाची घोषणा” ऐकणे शक्य झाले आहे.—स्तोत्र ९६:२.

तुमच्या मनात असे कोणी आहे का ज्याला तुम्ही देवाच्या राज्याची सुवार्ता व ही सुवार्ता त्यांच्या भवितव्यासाठी किती महत्त्वाची आहे हे सांगू शकता? ही सुवार्ता फक्त तुमच्यापर्यंतच ठेवू नका, तर शक्य तितक्या लवकर ती इतरांनाही सांगा!

  • कशाची “सुवार्ता” सांगण्याची गरज आहे?

  • यहोवाचे साक्षीदार कशा प्रकारे येशूच्या साक्ष देण्याच्या पद्धतीचे अनुकरण करत आहेत?