व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ १३

पायनियर म्हणजे काय?

पायनियर म्हणजे काय?

कॅनडा

घरोघरचे साक्षकार्य

बायबल अभ्यास

वैयक्तिक अभ्यास

“पायनियर” हा शब्द सहसा अशा लोकांसाठी वापरला जातो जे नवनवीन क्षेत्रांचा शोध लावतात आणि इतरांसाठी मार्ग तयार करतात. येशू हा एका अर्थी पायनियर होता. त्याला पृथ्वीवर जीवनदायी साक्षकार्य करण्यास आणि लोकांसाठी तारणाचा मार्ग उघडण्यास पाठवण्यात आले होते. (मत्तय २०:२८) आज त्याचे अनुयायी “शिष्य” बनवण्याच्या कार्यात जास्तीत जास्त वेळ खर्च करून त्याचे अनुकरण करत आहेत. (मत्तय २८:१९, २०) त्यांपैकी काही जणांनी पायनियर सेवा सुरू केली आहे.

पायनियर हा पूर्ण-वेळचा सुवार्तिक असतो. प्रत्येक यहोवाचा साक्षीदार सुवार्तेचा प्रचारक असतो. पण काही जणांनी आपल्या जीवनात फेरबदल केले आहेत ज्यामुळे त्यांना सामान्य पायनियर या नात्याने सेवा करणे शक्य झाले आहे आणि ते दर महिन्याला प्रचार कार्यात ७० तास खर्च करतात. असे करण्यासाठी बऱ्याच लोकांनी त्यांच्या नोकरीधंद्यात कमी वेळ घालवण्याचे ठरवले आहे. इतर काहींना खास पायनियर म्हणून सेवा करण्यासाठी निवडण्यात येते व त्यांना राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या भागात प्रचार कार्य करण्यास नेमले जाते. ते दर महिन्याला १३० किंवा त्याहून अधिक तास प्रचार कार्यात खर्च करतात. सर्व पायनियर आपली जीवनशैली साधी ठेवतात, कारण यहोवा देव त्यांच्या भौतिक गरजा नक्कीच पुरवेल याचा त्यांना पूर्ण भरवसा असतो. (मत्तय ६:३१-३३; १ तीमथ्य ६:६-८) जे लोक पूर्ण वेळ प्रचार कार्य करू शकत नाहीत ते शक्य तेव्हा साहाय्यक पायनियर म्हणून सेवा करू शकतात व महिन्याला ३० किंवा ५० तास करून आपले प्रचार कार्य वाढवू शकतात.

देवावर आणि लोकांवर असलेल्या प्रेमामुळे एका पायनियरला प्रेरणा मिळते. पृथ्वीवर असताना येशूने आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी भुकेले असलेले अनेक लोक पाहिले, आणि तसे लोक आज आपल्यालाही दिसतात. (मार्क ६:३४) पण आमच्याजवळ असे ज्ञान आहे ज्यामुळे आज त्यांना मदत होऊ शकते आणि भविष्यासाठी एक चांगली आशा मिळू शकते. शेजाऱ्यांवर असलेल्या प्रीतीमुळे एक पायनियर इतरांना आध्यात्मिक रीत्या मदत करण्यासाठी आपला जास्तीत जास्त वेळ व शक्ती खर्च करण्यास प्रवृत्त होतो. (मत्तय २२:३९; १ थेस्सलनीकाकर २:८) असे केल्यामुळे त्याचे देवासोबतचे नाते आणखी मजबूत होते, त्याचा विश्वास दृढ होतो आणि तो अधिक आनंद अनुभवतो.—प्रेषितांची कृत्ये २०:३५.

  • पायनियरची व्याख्या कशी करता येईल?

  • कोणत्या गोष्टीमुळे प्रवृत्त होऊन काही लोक पूर्ण वेळ पायनियर सेवा करतात?