व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ १७

प्रवासी पर्यवेक्षक आपल्याला कशी मदत करतात?

प्रवासी पर्यवेक्षक आपल्याला कशी मदत करतात?

मलावी

सेवा गटात

क्षेत्र सेवेत

वडिलांच्या सभेत

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत पौल व बर्णबा यांचा वारंवार उल्लेख करण्यात आला आहे. या दोघांनी प्रवासी पर्यवेक्षक या नात्याने सेवा केली. त्यांनी पहिल्या शतकातील मंडळ्यांना भेटी दिल्या. त्यांनी असे का केले? कारण त्यांना त्यांच्या आध्यात्मिक बांधवांची मनस्वी काळजी होती. पौलाने म्हटले की त्याला बांधवांना “भेटून ते कसे आहेत” हे पाहायचे होते. त्यांना आध्यात्मिक रीत्या दृढ करण्यासाठी तो शेकडो मैलांचा प्रवास करण्यास तयार होता. (प्रेषितांची कृत्ये १५:३६) आज आपल्या काळातील प्रवासी पर्यवेक्षकही अशीच मनोवृत्ती बाळगतात.

ते आपल्याला प्रोत्साहन देतात. विभागीय पर्यवेक्षक जवळजवळ २० मंडळ्यांना वर्षातून दोन वेळा भेटी देतात. ते प्रत्येक मंडळीसोबत एक आठवडा कार्य करतात. आपण त्यांच्या आणि ते विवाहित असतील तर त्यांच्या पत्नीच्या अनुभवांवरून खूप काही शिकू शकतो. ते मंडळीत प्रत्येकाला वैयक्तिक रीत्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्यासोबत क्षेत्रात कार्य करण्यास व आपण ज्यांच्यासोबत बायबल अभ्यास करतो त्यांनाही भेटण्यास उत्सुक असतात. हे पर्यवेक्षक मंडळीतील वडिलांसोबत मेंढपाळ भेटींसाठी जातात व आपल्याला विश्वासात दृढ करण्यासाठी सभा आणि संमेलनांमध्ये प्रोत्साहनदायक भाषणे देतात.—प्रेषितांची कृत्ये १५:३५.

ते प्रत्येकात वैयक्तिक आस्था घेतात. विभागीय पर्यवेक्षक मंडळ्यांच्या आध्यात्मिक स्थितीची नितांत काळजी करतात. मंडळीच्या आध्यात्मिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि मंडळीतील वडिलांच्या व सेवा सेवकांच्या जबाबदाऱ्यांसंबंधी व्यावहारिक सल्ला देण्यासाठी ते मंडळीच्या वडिलांची व सेवा सेवकांची सभा घेतात. ते पायनियरांना सेवेत यशस्वी होण्यासाठी मदत करतात, आणि सत्याबद्दल आस्था दाखवणाऱ्या नवीन लोकांना जाणून घेण्यास व त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी ऐकून घेण्यास उत्सुक असतात. आपले “सहकारी साथी” या नात्याने हे बांधव स्वतःला प्रवासी कार्यात झोकून देतात. (२ करिंथकर ८:२३) तेव्हा, त्यांच्या विश्वासाचे व देवाप्रती त्यांच्या एकनिष्ठेचे आपण अनुकरण केले पाहिजे.—इब्री लोकांस १३:७.

  • विभागीय पर्यवेक्षक मंडळ्यांना भेटी का देतात?

  • त्यांच्या भेटीचा तुम्ही फायदा कसा घेऊ शकता?