व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ २२

शाखा कार्यालयात कोणते काम केले जाते?

शाखा कार्यालयात कोणते काम केले जाते?

सोलोमन बेटे

कॅनडा

दक्षिण आफ्रिका

बेथेल कुटुंबातील सदस्य एक किंवा अनेक देशांतील राज्य प्रचाराला पाठिंबा देण्यासाठी निरनिराळ्या विभागांत कार्य करतात. ते भाषांतर गटांत, नियतकालिकांची छपाई करण्यात, पुस्तकांचे बाइंडिंग करण्यात, साहित्याचा साठा करण्यात, ऑडियो-व्हिडियो सीडी तयार करण्यात किंवा इतर कामांत मदत करतात.

शाखा समिती या कार्याची देखरेख करते. नियमन मंडळ प्रत्येक शाखा कार्यालयाचे कामकाज सांभाळण्यासाठी एका शाखा समितीला नेमते ज्यात तीन किंवा त्यापेक्षा जास्त अनुभवी वडील असतात. ही समिती त्यांच्या देखरेखीखाली असलेल्या भागातील कार्याचा व ते कोणत्या समस्यांना तोंड देत आहेत याचा अहवाल नियमन मंडळाला पुरवत असते. अशा अहवालांमुळे नवीन प्रकाशनांत, सभांमध्ये आणि संमेलनांमध्ये बांधवांच्या गरजेनुसार कोणत्या विषयावर मार्गदर्शन पुरवायचे हे नियमन मंडळाला ठरवता येते. नियमन मंडळाच्या प्रतिनिधींना नियमितपणे शाखा कार्यालयांमध्ये भेटी देण्यासाठी पाठवले जाते जेथे ते शाखा समितीतील बांधवांना त्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे हाताळण्याचे मार्गदर्शन देतात. (नीतिसूत्रे ११:१४) शाखा कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यालयाच्या प्रतिनिधीचा एक खास कार्यक्रम आयोजित केला जातो ज्यात ते एक भाषण देतात.

स्थानिक मंडळ्यांना मदत पुरवली जाते. शाखा कार्यालयातील जबाबदार बांधव नवीन मंडळ्या स्थापन करण्यासाठी संमती देतात. हे बांधव त्यांच्या शाखा क्षेत्रातील पायनियर, मिशनरी आणि विभागीय पर्यवेक्षक यांच्या कार्याचेही नियोजन करतात. ते संमेलने व अधिवेशने आयोजित करतात, नवीन राज्य सभागृहांच्या बांधकामाची आणि मंडळ्यांच्या गरजेनुसार त्यांच्यापर्यंत साहित्य पोचवण्याच्या कार्याची देखरेख करतात. शाखा कार्यालयात केले जाणारे प्रत्येक काम राज्य प्रचार कार्य सुव्यवस्थितपणे पार पाडण्यात मदत करते.—१ करिंथकर १४:३३, ४०.

  • शाखा समित्या नियमन मंडळाला कशा प्रकारे मदत करतात?

  • शाखा कार्यालयात कोणत्या जबाबदाऱ्या हाताळल्या जातात?