व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ २७

राज्य सभागृहातील ग्रंथालयाचा आपल्याला फायदा कसा होऊ शकतो?

राज्य सभागृहातील ग्रंथालयाचा आपल्याला फायदा कसा होऊ शकतो?

इझरायल

चेक रिपब्लिक

बेनिन

केमन बेटे

तुम्हाला बायबलविषयीचे ज्ञान वाढवण्याची इच्छा आहे का? बायबलमधील एखाद्या वचनाविषयी किंवा बायबलमध्ये उल्लेख केलेल्या एखाद्या व्यक्तीविषयी, ठिकाणाविषयी किंवा गोष्टीविषयी अधिक जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक आहात का? किंवा मग, तुमच्या एखाद्या वैयक्तिक समस्येवर मात करण्यास देवाचे वचन तुमची मदत करू शकते का असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? असल्यास, राज्य सभागृहातील आमच्या ग्रंथालयाला जरूर भेट द्या.

त्यात संशोधनाची अनेक उपयुक्त साधने असतात. तुमच्या भाषेत उपलब्ध असलेली यहोवाच्या साक्षीदारांची सगळीच बायबल-आधारित प्रकाशने कदाचित तुमच्याजवळ नसतील. पण, राज्य सभागृहातील ग्रंथालयात बहुतेक सगळी नवीन प्रकाशने ठेवलेली असतात. त्यात बायबलची निरनिराळी भाषांतरे, एक चांगला शब्दकोश आणि इतर उपयुक्त संदर्भग्रंथ ठेवलेले असतात. तुम्ही सभेच्या आधी किंवा नंतर ग्रंथालयात ठेवलेल्या या प्रकाशनांचा उपयोग करू शकता. जर कम्प्यूटर असेल तर त्यात वॉचटावर लायब्ररी असते. या कम्प्यूटर प्रोग्राममध्ये आपल्या प्रकाशनांचा खूप मोठा संचय असतो आणि त्यासोबतच संशोधनाची एक साधीसोपी सुविधा असते. या सुविधेचा उपयोग करून तुम्ही एका विशिष्ट विषयाची, शब्दाची किंवा शास्त्रवचनाची माहिती मिळवू शकता.

ईश्वरशासित सेवा प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त. तुमचे नाव ईश्वरशासित सेवा प्रशालेत नोंदवले असल्यास, तुम्हाला नेमून दिलेल्या भाषणाची तयारी करण्यासाठी राज्य सभागृहातील ग्रंथालयाचा तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो. प्रशाला पर्यवेक्षक ग्रंथालयाची देखरेख करतात. ग्रंथालयात नवीन प्रकाशने ठेवली आहेत व ती सुव्यवस्थित ठेवण्यात आली आहेत याची ते खातरी करतात. तुम्हाला हवी ती माहिती कशी मिळवता येईल हे प्रशाला पर्यवेक्षक किंवा तुमचा बायबल शिक्षक तुम्हाला दाखवू शकतो. पण, ग्रंथालयात ठेवलेली कोणतीच प्रकाशने घरी घेऊन जाण्याची मुभा नाही. ग्रंथालयातील सर्व पुस्तके आपण व्यवस्थित हाताळली पाहिजेत, त्यावर कोणत्याही खुणा करू नयेत.

बायबल म्हणते, की आपल्याला “देवाविषयीचे ज्ञान” प्राप्त करायचे असल्यास आपण “गुप्त निधीप्रमाणे” ते शोधले पाहिजे. (नीतिसूत्रे २:१-५) असे करण्यासाठी राज्य सभागृहातील ग्रंथालय तुम्हाला मदत करू शकते.

  • राज्य सभागृहातील ग्रंथालयात संशोधनाची कोणती साधने असतात?

  • ग्रंथालयाचा फायदा घेण्यास तुम्हाला कोण मदत करू शकतो?