व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ २८

आमच्या वेबसाईटवर तुम्हाला काय पाहायला मिळेल?

आमच्या वेबसाईटवर तुम्हाला काय पाहायला मिळेल?

फ्रान्स

पोलंड

रशिया

येशूने आपल्या शिष्यांना सांगितले होते: “तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे.” (मत्तय ५:१६) असे करण्यासाठी आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच इंटरनेटचा चांगला उपयोग करत आहोत. jw.org ही वेबसाईट यहोवाच्या साक्षीदारांच्या धार्मिक विश्वासांची व कार्यांची अधिकृत ऑनलाईन माहिती देते. त्यावर तुम्हाला काय पाहायला मिळेल?

बायबलविषयी सहसा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे. तुम्हाला आमच्या अधिकृत वेबसाईटवर, लोकांनी आजवर विचारलेल्या सगळ्यात महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे सापडतील. त्यांपैकी सहा प्रश्नांची उत्तरे जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? या पत्रिकेत दिली आहेत; ही पत्रिका ४०० हून अधिक भाषांमध्ये ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच, तुम्हाला १०० हून अधिक भाषांमध्ये न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन आणि बायबल अभ्यास करण्यासाठी तयार केलेली प्रकाशने जसे की बायबल नेमके काय शिकवते? आणि टेहळणी बुरूज अवेक! या नियतकालिकांचे नवीन अंक पाहायला मिळतील. यांपैकी अनेक प्रकाशने ऑनलाईन वाचली अथवा ऐकली जाऊ शकतात किंवा ऑडिओ, पीडिएफ किंवा ईपब (EPUB) स्वरूपात डाउनलोड केली जाऊ शकतात. आस्थेवाईक व्यक्तीला देण्यासाठी तुम्ही तिच्या भाषेत असलेल्या प्रकाशनांतील काही माहिती प्रिंटही करू शकता! याशिवाय, अनेक सांकेतिक भाषांत व्हिडिओ प्रकाशने उपलब्ध आहेत. फावल्या वेळात ऐकण्यासाठी तुम्ही बायबल उताऱ्यांचे नाट्यवाचन, बायबलची नाटके आणि मधुर संगीत डाउनलोड करू शकता.

यहोवाच्या साक्षीदारांविषयी खरी माहिती. या वेबसाईटवर आमच्या जगव्याप्त कार्याबद्दलची नवनवीन माहिती व व्हिडिओ क्लिप्स असतात; तसेच, यहोवाच्या साक्षीदारांशी संबंधित घटना आणि आम्ही माणुसकीच्या भावनेने केलेले मदतकार्य याचीही माहिती असते. सदर वेबसाईटवर तुम्हाला येत्या अधिवेशनांची माहिती व आमच्या शाखा कार्यालयांचा पत्ता आढळेल.

अशा सर्व मार्गांनी आम्ही पृथ्वीच्या सगळ्यात दुर्गम भागांपर्यंत सत्याचा प्रकाश पोहचवत आहोत. प्रत्येक खंडातील, अगदी अतिथंड असलेल्या अंटार्क्टिका म्हटल्या जाणाऱ्या खंडातील लोकांनासुद्धा याचा फायदा होत आहे. सबंध पृथ्वीवर “प्रभूच्या वचनाची त्वरेने प्रगती” होत राहावी आणि याद्वारे देवाचा गौरव होत राहावा अशी आमची प्रार्थना आहे.—२ थेस्सलनीकाकर ३:१.

  • बायबलचे सत्य शिकण्यास jw.org या वेबसाईटचा आज लोकांना कशा प्रकारे उपयोग होत आहे?

  • आमच्या वेबसाईटवर तुम्हाला कोणती माहिती वाचायला आवडेल?