व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ४

तिनं तिच्या बाबांना व यहोवाला खूश केलं

तिनं तिच्या बाबांना व यहोवाला खूश केलं

इफ्ताह यहोवाला काय प्रॉमिस करत आहे?

इफ्ताहाच्या मुलीला तिच्या बाबांनी यहोवाला केलेलं प्रॉमिस ठेवणं सोपं नव्हतं तरीपण ते पूर्ण केलं

तुला चित्रात ही मुलगी दिसते का?— ती इफ्ताहाची मुलगी आहे. बायबलमध्ये तिचं नाव सांगितलेलं नाहीय. पण तिनं तिच्या बाबांना व यहोवाला खूश कसं केलं ते सांगितलं आहे. आपण तिच्याबद्दल आणि तिचे बाबा इफ्ताह यांच्याबद्दल वाचून पाहू या.

इफ्ताह खूप चांगला माणूस होता. तो आपल्या मुलीला यहोवाबद्दल नेहमी शिकवत असे. तो खूप शक्तिमान आणि चांगला लीडर होता. म्हणून इस्राएली लोक त्याला त्यांच्या शत्रूंविरुद्ध लढायला सांगतात.

‘मला लढाईत जिंकव,’ अशी तो यहोवाला प्रार्थना करतो. तो यहोवाला असं प्रॉमिस करतो, की जर तू मला लढाईत जिंकवलंस तर, घरी गेल्यावर जी व्यक्ती सर्वात आधी मला भेटायला येईल, तिला मी तुला देऊन टाकेन. देऊन टाकेन म्हणजे ती व्यक्ती देवाच्या निवासमंडपातच अख्खं आयुष्य घालवेल. तिचा मृत्यू होईपर्यंत ती तिथंच राहील. निवासमंडप म्हणजे एक ठिकाण जिथं लोक यहोवाची उपासना करायला जायचे. झालं असं, की इफ्ताह लढाई जिंकतो! माहीतंय मग घरी गेल्यावर त्याला भेटायला सर्वात आधी कोण बाहेर येतं?—

हो, त्याचीच मुलगी! इफ्ताहाची ही एकुलती एक मुलगी आता मोठी झाली होती. आणि आता त्याला तिला निवासमंडपात राहायला पाठवावं लागेल! त्यामुळं त्याला खूप वाईट वाटतं. पण त्यानं यहोवाला प्रॉमिस केलेलं असतं ना! मग त्याची मुलगी त्याला म्हणते: ‘बाबा, तुम्ही यहोवाला प्रॉमिस केलंय ना, मग ते प्रॉमिस तुम्ही पाळलं पाहिजे.’

दर वर्षी इफ्ताहाच्या मुलीच्या मैत्रिणी तिला भेटायला जायच्या

खरंतर इफ्ताहाच्या मुलीलासुद्धा खूप वाईट वाटतं. निवासमंडपात राहिल्यावर तिला लग्न करणं शक्य नव्हतं किंवा मुलं होऊ देणं शक्य नव्हतं. पण या गोष्टींपेक्षा तिला, तिच्या बाबांनी यहोवाला दिलेलं प्रॉमिस पाळून त्याला खूश करावं, हे जास्त महत्त्वाचं वाटतं. म्हणून मग ती निवासमंडपात राहायला जाते आणि मरेपर्यंत तिथंच राहते.

तिच्या या वागण्यामुळं तिचे बाबा व यहोवा खूश झाले असतील का?— बरोबर. नक्कीच झाले. तूही यहोवाचं ऐकलं आणि त्याच्यावर प्रेम केलं तर इफ्ताहाच्या मुलीसारखं बनू शकतोस. आणि यामुळं आम्ही तुझे आईबाबा आणि यहोवासुद्धा खूप खूश होईल.

^ परि. 11 मूळ इब्री लिखाणांमध्ये या वचनात असे म्हटले आहे, की इफ्ताहाची मुलगी मरेपर्यंत निवासमंडपात राहिली व तिने लग्न केले नाही.