व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ९

यिर्मयानं लोकांना यहोवाबद्दल सांगायचं सोडलं नाही

यिर्मयानं लोकांना यहोवाबद्दल सांगायचं सोडलं नाही

लोक यिर्मयावर का चिडलेत?

यहोवानं चांगल्या लोकांना पाठवून यिर्मयाला वाचवलं

आपण लोकांना यहोवाबद्दल सांगतो तेव्हा कधीकधी ते आपली टिंगल करतात किंवा आपल्यावर चिडतात. मग देवाबद्दल बोलायलाच नको असं वाटतं. तुला वाटलं का असं कधी?— बायबलमध्ये एका माणसाबद्दल सांगितलंय ज्याला यहोवाबद्दल बोलायलाच नको असं वाटलं होतं. त्याचं नाव आहे यिर्मया. चल वाचून बघू या त्याच्याविषयी आपण.

यहोवानं यिर्मयाला एक काम दिलं. तुम्ही वाईट वागायचं सोडून द्या, असं त्याला लोकांना सांगायचं होतं. हे काम सोपं नव्हतं. त्याला भीती वाटत होती. तो यहोवाला म्हणाला: ‘मी कसं करू हे काम, मी तर किती लहान आहे.’ मग यहोवा त्याला म्हणाला: ‘घाबरू नकोस, मी तुला मदत करेन.’

तेव्हापासून यिर्मयानं लोकांना सांगायला सुरुवात केली की जर ते बदलले नाहीत तर यहोवा त्यांना शिक्षा देईल. लोकांनी त्याचं ऐकलं का?— नाही. उलट त्यांनी त्याची टिंगल केली. काही लोक तर त्याच्यावर चिडलेसुद्धा. त्यांना त्याला मारून टाकायचं होतं. तेव्हा यिर्मयाला कसं वाटलं असेल?— तो घाबरला आणि म्हणाला: ‘मी नाही सांगणार आता यहोवाबद्दल कुणाला.’ मग त्यानं सांगितलंच नाही का लोकांना?— खरंतर त्याचं यहोवावर इतकं प्रेम होतं, की तो जास्त दिवस शांत बसूच शकला नाही. तो सांगू लागला, आणि यहोवानं त्याला दुष्ट लोकांपासून वाचवलं.

काही वाईट लोकांनी तर एकदा त्याला एका विहिरीत टाकलं. त्याला जेवण किंवा पाणी दिलं नाही. त्या लोकांना वाटलं हा असाच मरून जाईल. पण यहोवानं चांगल्या लोकांना पाठवून त्याला वाचवलं.

यिर्मयाकडून आपण काय शिकतो बरं?— कधीकधी त्याला भीती वाटली होती तरी त्यानं यहोवाबद्दल लोकांना सांगायचं थांबवलं नाही. आपण जेव्हा लोकांना यहोवाबद्दल सांगू तेव्हा लोक आपली टिंगल करतील किंवा आपल्यावर चिडतील. अशा वेळेला आपल्याला लाज किंवा भीती वाटेल. पण तरीसुद्धा आपण यहोवाबद्दल लोकांना सांगायचं सोडायचं नाही. यहोवानं यिर्मयाला जशी मदत केली तशी तो आपल्यालासुद्धा नेहमी करेल.