व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाची आपल्यासाठी काय इच्छा आहे?

देवाची आपल्यासाठी काय इच्छा आहे?

जेव्हा तुम्ही पेपर वाचता, टीव्ही पाहता किंवा रेडिओ ऐकता तेव्हा सहसा गुन्हेगारी, युद्ध, दहशतवाद यांविषयीच्याच बातम्या असतात. कदाचित तुम्ही स्वतः एखाद्या आजाराने पीडित असाल किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला असेल.

तुम्ही कदाचित म्हणाल:

  • माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी देवाची हीच इच्छा आहे का?

  • माझ्या समस्यांना तोंड देण्याकरता मला मदत कुठून मिळेल?

  • आपल्याला कधी खरी शांती अनुभवता येईल का?

या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं बायबलमध्ये दिली आहेत.

देव पृथ्वीवर आश्चर्यकारक गोष्टी करणार आहे, असं बायबलमध्ये सांगितलं आहे.

बायबलमधल्या शिकवणींचा फायदा घ्या

या पुस्तकाच्या सुरुवातीच्या पानांवर सांगितलेल्या गोष्टी नुसत्या कल्पना आहेत, असा तुम्ही विचार कराल. पण, खूप लवकर पृथ्वीवर हे बदल करण्याचं वचन देवाने दिलं आहे आणि ते तो कसं पूर्ण करणार आहे ते बायबलमध्ये सांगितलं आहे.

बायबलमध्ये इतरही विषयांवर माहिती दिली आहे. आजच्या जीवनात खरं सुख मिळवण्यासाठी काय करण्याची गरज आहे, हेही बायबलमध्ये सांगितलं आहे. तुम्हाला चिंता वाटत असलेल्या गोष्टींवर थोडा विचार करा. यात कदाचित, पैशांची, कुटुंबाची, बिघडत चाललेल्या तुमच्या तब्येतीची किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे येणारी चिंता असू शकेल. पण याही चिंतांवर मात करण्यासाठी बायबलमध्ये मदत पुरवली आहे. शिवाय, त्यात पुढे दिलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं असल्यामुळे तुम्हाला सांत्वन मिळू शकेल. जसं की:

तुम्ही या पुस्तकाचा अभ्यास करायला तयार झालात यावरून कळतं, की तुम्हाला बायबलमधल्या शिकवणी माहीत करून घ्यायच्या आहेत. या पुस्तकाच्या अभ्यासातून तुम्हाला खरोखरच खूप मदत मिळेल. प्रत्येक अध्यायातल्या परिच्छेदांसाठी प्रश्न आहेत. यांमुळे तुम्हाला बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी सहज व स्पष्ट रीत्या समजतील. कोट्यवधी लोकांना यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास केल्यामुळे फायदा झाला आहे. तसाच तुम्हालाही होईल, अशी आम्ही आशा करतो. हा अभ्यास करताना तुमच्यावर देवाचा आशीर्वाद असो!