व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय चौदा

तुमचं कुटुंब सुखी होऊ शकतं!

तुमचं कुटुंब सुखी होऊ शकतं!

१, २. कुटुंबांसाठी यहोवाची काय इच्छा आहे?

यहोवा देवाने पहिलं लग्न लावलं. बायबलमध्ये सांगितलं आहे की त्याने स्त्रीला निर्माण केल्यानंतर “तिला आदामकडे नेले” तेव्हा तो आनंदी होऊन म्हणाला: “ही . . . माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे.” (उत्पत्ति २:२२, २३) यावरून कळतं की सर्व विवाहित जोडप्यांनी आनंदी असावं अशी यहोवाची इच्छा आहे.

दुःखाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना आनंदी कौटुंबिक जीवन म्हणजे काय, हे माहीतच नाही. पण बायबलमध्ये अशी अनेक तत्त्वं दिली आहेत जी कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यासाठी मदतीची ठरतील आणि त्यामुळे त्यांना एक आनंदी व यशस्वी कौटुंबिक जीवन जगता येईल.—लूक ११:२८.

देव पतींकडून काय अपेक्षा करतो

३, ४. (क) पतीने आपल्या पत्नीशी कसं वागलं पाहिजे?(ख) पती आणि पत्नीने एकमेकांना क्षमा करणं का महत्त्वाचं आहे?

पतीने आपल्या पत्नीला प्रेमाने व आदराने वागवलं पाहिजे असं बायबलमध्ये म्हटलं आहे. कृपया इफिसकर ५:२५-२९ वाचा. पतीने आपल्या पत्नीशी नेहमी प्रेमाने वागलं पाहिजे. त्याने तिचा सांभाळ केला पाहिजे आणि तिची काळजी घेतली पाहिजे. तसंच, तो अशी कोणतीही गोष्ट करणार नाही ज्यामुळे तिला इजा होईल.

पण जेव्हा पत्नी एखादी चूक करते तेव्हा पतीने काय केलं पाहिजे? बायबलमध्ये पतींना असं सांगण्यात आलं आहे: “पतींनो, आपल्या पत्नींवर प्रेम करा आणि त्यांच्याशी कठोरपणे वागू नका.” (कलस्सैकर ३:१९) पतींनो, लक्षात असू द्या की तुमच्याकडून देखील चुका होतात आणि यहोवाने तुम्हाला क्षमा करावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीही आपल्या पत्नीला क्षमा केली पाहिजे. (मत्तय ६:१२, १४, १५) जेव्हा पती आणि पत्नी एकमेकांना क्षमा करायला तयार असतील तेव्हा त्यांचं वैवाहिक जीवन सुखी होईल.

५. पतीने आपल्या पत्नीला आदराने का वागवलं पाहिजे?

पतीने आपल्या पत्नीला आदराने वागवावं अशी यहोवा अपेक्षा करतो. पतीने आपल्या पत्नीच्या शारीरिक व भावनिक गरजांचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे, कारण ही खूप गंभीर गोष्ट आहे. जर पतीने आपल्या पत्नीला चांगली वागणूक दिली नाही तर यहोवा त्याची प्रार्थना ऐकणार नाही. (१ पेत्र ३:७) यहोवा स्त्री-पुरुष यांमध्ये भेदभाव करत नाही तर जे कोणी त्याच्यावर प्रेम करतात ते त्याला प्रिय आहेत.

६. पती आणि पत्नी “एकदेह” असण्याचा काय अर्थ होतो?

पती आणि पत्नी “दोन नाहीत तर एकदेह अशी आहेत,” असं येशूने समजावलं. (मत्तय १९:६) ते एकमेकांशी एकनिष्ठ असतात आणि कधीही एकमेकांची फसवणूक करत नाहीत. (नीतिसूत्रे ५:१५-२१; इब्री लोकांना १३:४) दोघांनीही निस्वार्थपणे एकमेकांच्या शारीरिक गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. (१ करिंथकर ७:३-५) “कोणताही मनुष्य स्वतःच्या शरीराचा द्वेष करत नाही; उलट, तो त्याचे पालनपोषण करतो,” या गोष्टीची आठवण पतीने ठेवली पाहिजे. त्यामुळे त्याने आपल्या पत्नीची प्रेमाने काळजी घेतली पाहिजे. आपल्या पतीने आपल्याशी कोमलतेने व प्रेमाने वागावं हेच एका पत्नीसाठी सर्वात महत्त्वाचं असतं.—इफिसकर ५:२९.

देव पत्नींकडून काय अपेक्षा करतो

७. कुटुंबात, कुटुंबप्रमुखाची गरज का असते?

प्रत्येक कुटुंबाला मार्गदर्शन देण्यासाठी कुटुंबप्रमुखाची गरज असते, ज्यामुळे कुटुंबातले सर्व सदस्य प्रेमाने एकत्र राहतील. बायबलमध्ये १ करिंथकर ११:३ या वचनात असं म्हटलं आहे: “प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; प्रत्येक स्त्रीचे मस्तक पुरुष आहे; आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे.”

८. एक पत्नी आपल्या पतीचा मनापासून आदर कसा करू शकते?

प्रत्येक पतीकडून चुका होतात. पण पतीने घेतलेल्या निर्णयांना पत्नी स्वखुशीने सहकार्य देते तेव्हा पूर्ण कुटुंबाला फायदा होतो. (१ पेत्र ३:१-६) बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “पत्नीने आपल्या पतीचा मनापासून आदर करावा.” (इफिसकर ५:३३) पण समजा, पतीचा धार्मिक विश्वास पत्नीच्या धार्मिक विश्वासांपासून वेगळा असेल तेव्हा काय? अशा वेळीदेखील पत्नीने आपल्या पतीचा मनापासून आदर केला पाहिजे. बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “पत्नींनो, तुम्हीसुद्धा आपल्या पतींच्या अधीन राहा, म्हणजे जरी एखादा पती वचनाचे पालन करणारा नसला, तरी त्याने एकाही शब्दाशिवाय केवळ आपल्या पत्नीच्या वागणुकीमुळे, अर्थात, तिचे शुद्ध आचरण आणि ती मनापासून दाखवत असलेला आदर पाहून विश्वासात यावे.” (१ पेत्र ३:१, २) पत्नीच्या चांगल्या वागण्या-बोलण्यामुळे पती तिचा धार्मिक विश्वास समजून घेईल व त्याचा आदरही करेल.

९. (क) पत्नीला पतीचं म्हणणं पटत नसेल तर तिने काय केलं पाहिजे? (ख) तीत २:४, ५ या वचनात पत्नींसाठी काय सल्ला देण्यात आला आहे?

पत्नीला पतीचं म्हणणं पटत नसेल, तर ती काय करू शकते? ती आपलं मत आदरपूर्वक मांडू शकते. उदाहरणार्थ, एकदा साराने अब्राहामला सांगितलेली गोष्ट त्याला आवडली नाही तेव्हा यहोवा त्याला म्हणाला: तिचं बोलणं “ऐक.” (उत्पत्ति २१:९-१२) एक ख्रिस्ती पती जो निर्णय घेईल तो सहसा बायबलच्या तत्त्वांवर आधारित असेल, त्यामुळे त्याने घेतलेल्या निर्णयाला पत्नीने सहकार्य करायला हवं. (प्रेषितांची कार्ये ५:२९; इफिसकर ५:२४) एक चांगली पत्नी आपल्या कुटुंबाची काळजी घेते. (तीत २:४, ५ वाचा.) पत्नी आपल्या कुटुंबासाठी किती कष्ट करते हे पाहून तिचा पती आणि मुलं, तिचा आणखी आदर करतील व तिच्यावर जास्त प्रेम करतील.—नीतिसूत्रे ३१:१०, २८.

पत्नींसाठी सारा एक चांगलं उदाहरण कशी आहे?

१०. वेगळं होण्याबद्दल आणि घटस्फोट घेण्याबद्दल बायबल काय म्हणतं?

१० काही वेळा जोडपी लगेच वेगळी होतात किंवा घटस्फोट घेतात. पण बायबलमध्ये असं म्हटलं आहे, “पत्नीने आपल्या पतीपासून वेगळे होऊ नये” आणि “पतीनेही आपल्या पत्नीला सोडू नये.” (१ करिंथकर ७:१०, ११) काही टोकाच्या परिस्थितींत एक जोडपं वेगळं होण्याचं ठरवेल पण हा एक गंभीर निर्णय आहे. पण घटस्फोट घेण्याविषयी काय? बायबलनुसार, पती किंवा पत्नीने आपल्या जोडीदाराशिवाय इतर कोणासोबत लैंगिक संबंध ठेवले तर ते घटस्फोट घेण्याचं एकमेव योग्य कारण आहे.—मत्तय १९:९.

देव पालकांकडून काय अपेक्षा करतो

कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यासाठी येशू एक चांगलं उदाहरण आहे

११. मुलांना सर्वात जास्त कशाची गरज आहे?

११ पालकांनो, आपल्या मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मुलांना तुमची गरज आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही त्यांना यहोवाविषयी शिकवण्याची गरज आहे.—अनुवाद ६:४-९.

१२. आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी पालकांनी काय करायला हवं?

१२ सैतानाचं जग दिवसेंदिवस वाईट होत चाललं आहे. काही लोक मुलांना इजा करू पाहतात आणि त्यांचं लैंगिक शोषणदेखील करू पाहतात. काही पालकांना अशा विषयांवर आपल्या मुलांशी चर्चा करायला लाज वाटते. पण, पालकांनी आपल्या मुलांना सावध राहायला व अशा लोकांपासून दूर राहायला शिकवलं पाहिजे. पालकांनो, तुम्ही आपल्या मुलांना जपलं पाहिजे. *१ पेत्र ५:८.

१३. पालकांनी आपल्या मुलांना कसं शिकवलं पाहिजे?

१३ मुलांनी कसं वागावं हे शिकवण्याची जबाबदारी त्यांच्या पालकांवर असते. तुम्ही तुमच्या मुलांना कसं शिकवाल? मुलांना योग्य प्रशिक्षणाची गरज आहे, पण त्यांच्या चुका सुधारताना कधीच क्रूरपणे किंवा निष्ठुरपणे वागू नका. (यिर्मया ३०:११) तुम्ही रागाच्या भरात असाल तेव्हा आपल्या मुलांना शिक्षा करू नका. तुमचे शब्द “तलवार भोसकावी तसे” नसले पाहिजेत कारण त्यामुळे ती दुखावतील. (नीतिसूत्रे १२:१८) मुलांनी आज्ञाधारक का असावं, हे समजण्यास त्यांना मदत करा.—इफिसकर ६:४; इब्री लोकांना १२:९-११; अंत्यटीप ३० पाहा.

देव मुलांकडून काय अपेक्षा करतो?

१४, १५. मुलांनी आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत का असलं पाहिजे?

१४ येशूने कठीण प्रसंगातदेखील नेहमी आपल्या वडिलांच्या आज्ञेचं पालन केलं. (लूक २२:४२; योहान ८:२८, २९) मुलांनीसुद्धा आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहावं अशी यहोवाची अपेक्षा आहे.—इफिसकर ६:१-३.

१५ मुलांनो, तुम्हाला आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळणं कठीण वाटत असलं तरीही तुम्ही त्यांचं ऐकता, तेव्हा यहोवाला आणि तुमच्या आईवडिलांना आनंद होतो. *नीतिसूत्रे १:८; ६:२०; २३:२२-२५.

चुकीच्या गोष्टी करण्याचा मोह होतो तेव्हा तरुण लोक यहोवाला एकनिष्ठ कसे राहू शकतात?

१६. (क) सैतान तरुणांना वाईट गोष्टी करण्याचा मोह कसा घालतो? (ख) यहोवावर प्रेम करणारे मित्र निवडणं का महत्त्वाचं आहे?

१६ सैतान तुमच्या मित्रांचा आणि इतर तरुणांचा वापर करून तुम्हाला चुकीच्या गोष्टी करण्याचा मोह घालू शकतो. या दबावाचा सामना करणं खूप कठीण आहे हे त्याला माहीत आहे. उदाहरणार्थ, याकोबची मुलगी दीना हिने अशा लोकांसोबत मैत्री केली ज्यांचं यहोवावर प्रेम नव्हतं. यामुळे तिला आणि तिच्या पूर्ण कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागला. (उत्पत्ति ३४:१, २) जर तुमचे मित्र यहोवावर प्रेम करणारे नसतील, तर ते तुम्हाला अशा गोष्टी करायला भाग पाडतील ज्या यहोवाला पसंत नाहीत. अशाने तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आणि देवाला खूप दुःख होईल. (नीतिसूत्रे १७:२१, २५) त्यामुळे असे मित्र निवडा ज्यांचं यहोवावर प्रेम आहे.—१ करिंथकर १५:३३.

तुमचं कुटुंब सुखी होऊ शकतं

१७. कुटुंबात प्रत्येकाची काय जबाबदारी आहे?

१७ कुटुंबातले सर्व सदस्य जेव्हा देवाच्या मार्गदर्शनानुसार चालतात तेव्हा ते बऱ्याच समस्या टाळू शकतात. तेव्हा, पतींनो आपल्या पत्नीशी प्रेमाने वागा. पत्नींनो, आपल्या पतीच्या अधीन राहा, त्यांचा आदर करा आणि नीतिसूत्रे ३१:१०-३१ या वचनात उल्लेख केलेल्या पत्नीच्या उदाहरणाचं अनुकरण करा. पालकांनो, आपल्या मुलांना देवावर प्रेम करायला शिकवा. (नीतिसूत्रे २२:६) तुम्ही जर एक पिता आहात तर “चांगल्या प्रकारे” आपल्या कुटुंबाचं मार्गदर्शन करा. (१ तीमथ्य ३:४, ५; ५:८) तसंच मुलांनो, आपल्या आईवडिलांच्या आज्ञेचं पालन करा. (कलस्सैकर ३:२०) कुटुंबातल्या प्रत्येकाकडून चुका होऊ शकतात, त्यामुळे नम्र राहा आणि एकमेकांची क्षमा मागा. खरंच, बायबलमध्ये यहोवाने कुटुंबातल्या प्रत्येकासाठी मार्गदर्शन दिलं आहे.

^ परि. 12 आपल्या मुलांचं संरक्षण कसं करायचं याबद्दल अधिक माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या महान शिक्षक से सीखिए या पुस्तकाचा अध्याय ३२ पाहा.

^ परि. 15 आईवडिलांनी आपल्या मुलांना देवाच्या नियमांविरुद्ध जाऊन काही करायला सांगितलं, तर मुलांना ते करण्याची गरज नाही.—प्रेषितांची कार्ये ५:२९.