व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ १

देवाने स्वर्ग आणि पृथ्वी बनवली

देवाने स्वर्ग आणि पृथ्वी बनवली

यहोवा देव आपला निर्माणकर्ता आहे. त्याने सर्वकाही बनवलं. ज्या गोष्टी आपण पाहू शकतो आणि पाहू शकत नाही त्या सर्व गोष्टी त्याने बनवल्या. आपण जे पाहू शकतो ते बनवण्याच्या आधी त्याने स्वर्गात खूपसारे देवदूत बनवले. तुला माहीत आहे देवदूत म्हणजे कोण? देवदूत हे देवाचे सेवक आहेत. ते त्याच्यासारखे आहेत. म्हणजे जसं आपण यहोवा देवाला पाहू शकत नाही, तसं आपण त्यांनाही पाहू शकत नाही. यहोवाने जो पहिला देवदूत बनवला, तो त्याला मदत करू लागला. त्याने यहोवाला तारे, ग्रह आणि दुसऱ्‍या सर्व गोष्टी बनवण्यासाठी मदत केली. त्यांच्यापैकी एक म्हणजे आपली पृथ्वी. पृथ्वी आपलं एक सुंदर घर आहे.

मग प्राणी आणि मानव यांना राहता येईल अशा प्रकारे देवाने पृथ्वीवर तयारी केली. त्याने सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर आणला. त्याने खूपसारे डोंगर, समुद्र आणि नद्या बनवल्या.

मग काय झालं? यहोवा म्हणाला: ‘मी गवत, रोपटी आणि झाडं बनवणार आहे.’ a मग वेगवेगळ्या प्रकारची फळं, भाज्या आणि फुलं येऊ लागली. त्यानंतर यहोवाने सर्व प्रकारचे प्राणी बनवले. त्याने पक्षी, मासे आणि जमिनीवर सरपटणारे प्राणी बनवले. त्याने काही छोटे प्राणी बनवले, जसं की ससा. त्याने हत्तीसारखे मोठमोठे प्राणीही बनवले. तुला कोणता प्राणी आवडतो?

मग यहोवाने त्या पहिल्या देवदूताला म्हटलं: ‘आपण मानव बनवू या.’ मानव प्राण्यांपेक्षा वेगळे असणार होते. त्यांना बोलायला, हसायला आणि प्रार्थना करायला येणार होतं. ते नवनवीन गोष्टींचा शोध लावणार होते. ते पृथ्वीची आणि प्राण्यांची काळजी घेणार होते. तुला माहीत आहे पहिला पुरुष कोण होता? चल पाहू या.

a या संपूर्ण पुस्तकात एकेरी अवतरण चिन्हांचा वापर एखाद्याच्या बोलण्याला सूचित करण्यासाठी केला आहे.

“प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्‍न केली.”—उत्पत्ति १:१