व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ७

बाबेलचा बुरूज

बाबेलचा बुरूज

जलप्रलयानंतर नोहाच्या मुलांना खूप मुलं झाली. मग त्यांचं कुटुंब वाढत गेलं. आणि यहोवाने सांगितलं होतं त्याप्रमाणे लोक पूर्ण पृथ्वीवर पसरले.

पण काही कुटुंबांनी यहोवाचं ऐकलं नाही. ते म्हणाले: ‘चला आपण एक शहर बांधून इथेच राहू. तसंच एक बुरूजसुद्धा बांधू. इतका उंच, की तो अगदी आकाशापर्यंत पोचेल. यामुळे आपलं नाव मोठं होईल.’

पण लोक जे करत होते ते पाहून यहोवाला दुःख झालं. म्हणून त्याने त्यांना थांबवण्याचं ठरवलं. त्याने हे कसं केलं तुला माहीत आहे? त्याने असं काहीतरी केलं, की लोक अचानक वेगवेगळ्या भाषा बोलू लागले. ते काय बोलत होते ते एकमेकांना कळतच नव्हतं. त्यामुळे बुरूज बांधायचं काम त्यांना थांबवावं लागलं. ते जे शहर बांधत होते त्याचं नाव बाबेल पडलं. बाबेलचा अर्थ होतो, गोंधळ. त्यानंतर लोक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागले. अशा प्रकारे ते पूर्ण पृथ्वीवर पसरले. नवीन ठिकाणी जाऊनसुद्धा ते वाईट कामं करत राहिले. मग, अशी एकही व्यक्‍ती नव्हती का, जिचं यहोवावर प्रेम होतं? हे आपल्याला पुढच्या धड्यात समजेल.

“जो कोणी स्वतःला उंच करतो त्याला नमवलं जाईल आणि जो कोणी स्वतःला नम्र करतो त्याला उंचावलं जाईल.”—लूक १८:१४