व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ९२

येशू मासे धरणाऱ्‍यांना भेटतो

येशू मासे धरणाऱ्‍यांना भेटतो

येशू प्रेषितांना भेटल्याच्या काही काळानंतर, पेत्र गालील समुद्रात मासे धरण्यासाठी गेला. त्या वेळी थोमा, याकोब, योहान आणि इतर काही शिष्यसुद्धा पेत्रसोबत गेले. रात्रभर प्रयत्न करूनही त्यांना मासे मिळाले नाहीत.

मग दुसऱ्‍या दिवशी पहाटे त्यांना समुद्रकिनाऱ्‍यावर एक माणूस दिसला. त्याने मोठ्याने हाक मारून त्यांना विचारलं: ‘तुम्हाला मासे मिळाले का?’ त्यावर त्यांनी उत्तर दिलं: “नाही!” मग त्या माणसाने म्हटलं: ‘बोटीच्या उजवीकडे जाळं टाका, म्हणजे तुम्हाला मासे मिळतील.’ जेव्हा त्यांनी तसं केलं, तेव्हा त्यांचं जाळं माशांनी भरून गेलं. इतकं, की त्यांना ते जाळं वर ओढताच आलं नाही. तेव्हा अचानक योहानला जाणवलं, की तो माणूस येशू आहे आणि तो म्हणाला: “हा तर प्रभू आहे!” मग लगेच पेत्रने समुद्रात उडी टाकली आणि तो किनाऱ्‍यापर्यंत पोहत आला. बाकीचे शिष्य बोटीतून किनाऱ्‍यापर्यंत आले.

किनाऱ्‍यावर पोचल्यावर त्यांनी पाहिलं, की निखाऱ्‍यांवर भाकरी आणि मासे ठेवलेले आहेत. खाण्यासाठी आणखी मासे हवे होते. त्यामुळे, येशूने त्यांना धरलेल्या माशांपैकी काही आणायला सांगितले. मग त्याने म्हटलं: ‘या, खाऊन घ्या.’

त्यांचं खाऊन झाल्यावर येशूने पेत्रला विचारलं: ‘मासे धरण्याच्या कामापेक्षा तुझं माझ्यावर जास्त प्रेम आहे का?’ पेत्रने उत्तर दिलं: ‘हो प्रभू, आणि तुला तर ते माहीत आहे.’ येशू त्याला म्हणाला: ‘माझ्या कोकरांना खाऊ घाल.’ मग येशूने पुन्हा पेत्रला विचारलं: ‘पेत्र, तू माझ्यावर प्रेम करतोस का?’ पेत्रने उत्तर दिलं: ‘प्रभू, माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे तर तुला माहीत आहे.’ येशू म्हणाला: “माझ्या लहान मेढरांची काळजी घे.” नंतर येशूने तिसऱ्‍यांदाही त्याला तेच विचारलं. या वेळी पेत्र फार दुःखी झाला. तो म्हणाला: ‘प्रभू, तुला तर सर्वकाही माहीत आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे तू जाणतोस.’ येशूने त्याला म्हटलं: ‘माझ्या लहान मेढरांना खाऊ घाल.’ त्यानंतर येशूने पेत्रला म्हटलं: “माझ्यामागे चालत राहा.”

“[येशू] त्यांना म्हणाला: ‘माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसं धरणारे करेन.’ हे ऐकताच त्यांनी आपली जाळी टाकून दिली आणि ते त्याच्यामागे चालू लागले.” —मत्तय ४:१९, २०