व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ९३

येशू स्वर्गात परत जातो

येशू स्वर्गात परत जातो

गालीलमध्ये येशू त्याच्या शिष्यांना भेटला. येशूने त्यांना खूप महत्त्वाची आज्ञा दिली. तो म्हणाला: ‘जा आणि सर्व देशांच्या लोकांना शिष्य करा. ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या, त्या त्यांना शिकवा आणि त्यांना बाप्तिस्मा द्या.’ त्यानंतर त्याने शिष्यांना वचन दिलं: ‘मी नेहमी तुमच्यासोबत असेन, हे आठवणीत ठेवा.’

येशूचं पुनरुत्थान होऊन ४० दिवस झाले होते. या काळात तो गालील आणि यरुशलेममधल्या त्याच्या अनेक शिष्यांना भेटला. त्याने शिष्यांना महत्त्वपूर्ण गोष्टी शिकवल्या. तसंच, त्याने खूप चमत्कारही केले. त्यानंतर तो प्रेषितांना जैतुनांच्या डोंगरावर भेटला. ही प्रेषितांसोबत त्याची शेवटची भेट असणार होती. तो त्यांना म्हणाला: ‘यरुशलेममध्येच राहा. पित्याने जे वचन दिलं आहे, ते पूर्ण होण्याची वाट पाहा.’

पण येशूने जे म्हटलं त्याचा अर्थ प्रेषितांना समजला नाही. त्यामुळे त्यांनी त्याला विचारलं: ‘तू आताच इस्राएलचा राजा बनणार आहेस का?’ येशूने उत्तर दिलं: ‘मी आता राजा बनावं अशी यहोवाची इच्छा नाही. कारण ही ती वेळ नाही. लवकरच तुमच्यावर पवित्र आत्मा येईल आणि तुम्हाला शक्‍ती मिळेल. त्यानंतर तुम्ही माझे साक्षी व्हाल. तेव्हा यरुशलेममध्ये, यहूदीयात, शोमरोनात, तसंच पूर्ण पृथ्वीवर दूरदूरच्या ठिकाणी जाऊन माझ्याविषयी प्रचार करा.’

त्यानंतर, येशूला वर आकाशात घेण्यात आलं आणि एका ढगाने त्याला झाकलं. त्याचे शिष्य वर पाहत होते, पण तो दिसेनासा झाला.

मग शिष्य जैतुनांच्या डोंगरावरून खाली उतरले. त्यानंतर ते यरुशलेमला गेले. तिथे ते माडीवरच्या खोलीत नेहमी एकत्र येऊन प्रार्थना करायचे. ते येशूच्या पुढच्या सूचनांची वाट पाहत होते.

“सर्व राष्ट्रांना साक्ष मिळावी म्हणून राज्याचा हा आनंदाचा संदेश सर्व जगात घोषित केला जाईल, आणि त्यानंतर अंत येईल.”—मत्तय २४:१४