व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ १०३

“तुझं राज्य येवो”

“तुझं राज्य येवो”

‘यापुढे रडणं, दुःख, आजारपण किंवा मरण नसेल. मी त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेन. आधी घडलेल्या वाईट गोष्टी आठवणारही नाहीत,’ असं वचन यहोवाने दिलं.

यहोवाने आदाम आणि हव्वा यांना एदेन बागेत ठेवलं होतं. तिथे ते आनंदाने आणि शांतीने राहणार होते. ते आपल्या स्वर्गातल्या पित्याची उपासना करणार होते आणि ही पृथ्वी त्यांच्या मुलांनी भरून जाणार होती. पण आदाम आणि हव्वाने यहोवाचं ऐकलं नाही. असं असलं तरी, मानवांसाठी असलेली यहोवाची इच्छा बदललेली नाही. यहोवा जे काही वचन देतो ते पूर्ण होतं, हे आपण या पुस्तकात पाहिलं. यहोवाने अब्राहामला वचन दिलं होतं, की त्याच्या राज्यामुळे पृथ्वीला अनेक आशीर्वाद मिळतील. आणि हे वचन नक्की पूर्ण होईल.

लवकरच सैतान, त्याचे दुरात्मे, आणि सर्व वाईट लोक नाहीसे होतील. जे वाचतील ते सर्व यहोवाची उपासना करतील. आपण कधीच आजारी पडणार नाही किंवा मरणारही नाही. याउलट, रोज सकाळी उठल्यावर आपल्याला अगदी ताजंतवानं वाटेल. आणि आपण जिवंत आहोत याचा आपल्याला आनंद असेल. संपूर्ण पृथ्वी नंदनवन किंवा एका सुंदर बागेसारखी बनेल. आपल्या सर्वांना चांगलं अन्‍न मिळेल. आपल्या प्रत्येकाकडे घर असेल आणि तिथे आपण सुरक्षित राहू. तसंच, तेव्हा लोक प्रेमळ आणि दयाळू असतील. कोणीही क्रूर किंवा हिंसक नसेल. आपल्याला जंगली प्राण्यांची भीती वाटणार नाही आणि तेसुद्धा आपल्याला घाबरणार नाहीत.

यहोवा मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत करेल, तेव्हा आपल्याला खूप आनंद होईल. नाही का? त्या वेळी आपण आधीच्या काळातल्या लोकांचंही स्वागत करू. जसं की हाबेल, नोहा, अब्राहाम, सारा, मोशे, रूथ, एस्तेर आणि दावीद. या पृथ्वीला नंदनवन बनवण्याच्या कामात तेसुद्धा आपल्याला मदत करतील. आनंद देणारी खूपसारी कामं आपल्याकडे असतील.

तूही नंदनवनात असावं, अशी यहोवाची इच्छा आहे. त्या वेळी तुला यहोवाबद्दल अशा खूपकाही गोष्टी समजतील, ज्याची आता तू कल्पनाही करू शकत नाही. तेव्हा, यहोवासोबतचं आपलं नातं आपण आज आणि पुढेही आणखी मजबूत करत राहू या!

“यहोवा आमच्या देवा, गौरव, सन्मान आणि सामर्थ्य मिळण्यास तूच योग्य आहेस; कारण तू सर्व गोष्टी निर्माण केल्या.” —प्रकटीकरण ४:११