व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग १ ची प्रस्तावना

भाग १ ची प्रस्तावना

बायबलची सुरुवात सृष्टीच्या अहवालाने होते. यहोवाने स्वर्गात आणि पृथ्वीवर ज्या सुंदर गोष्टी बनवल्या आहेत त्याची माहिती आपल्याला त्यात मिळते. तुम्हाला मुलं असतील तर त्यांना सृष्टीत दिसणाऱ्‍या वेगवेगळ्या आश्‍चर्यकारक गोष्टी समजण्यासाठी मदत करा. देवाने मानवांना प्राण्यांपेक्षा कशा प्रकारे श्रेष्ठ बनवलं आहे ते मुलांना सांगा. त्याने मानवांना बोलण्याची, तर्क करण्याची, शोध लावण्याची, गाण्याची आणि प्रार्थना करण्याची जी खास क्षमता दिली आहे, त्यावर त्यांचं लक्ष आकर्षित करा. यहोवाच्या शक्‍तीसाठी, त्याच्या बुद्धीसाठी आणि खासकरून निर्मितीवर आणि आपल्या प्रत्येकावर त्याचं जे प्रेम आहे त्यासाठी त्यांच्या मनात कदर वाढवा.

या विभागात

पाठ १

देवाने स्वर्ग आणि पृथ्वी बनवली

बायबल म्हणतं की देवाने स्वर्ग आणि पृथ्वी बनवली. तुला माहीत आहे का, त्याने सर्वकाही बनवण्याआधी कुठला देवदूत बनवला?

पाठ २

देवाने पहिला पुरुष आणि पहिली स्त्री बनवली

देवाने पहिला पुरुष आणि पहिली स्त्री बनवली आणि त्यांना एदेन बागेत ठेवलं. त्यांनी आपलं कुटुंब वाढवून संपूर्ण पृथ्वीला नंदनवन बनवावं अशी देवाची इच्छा होती.