व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग २ ची प्रस्तावना

भाग २ ची प्रस्तावना

यहोवाने जलप्रलय आणून जगाचा नाश का केला होता? मानव इतिहासाच्या सुरुवातीला सैतानाने यहोवाविरुद्ध बंड केलं. काही जणांनी जसं की आदाम, हव्वा आणि त्यांचा मुलगा काइन यांनी सैतानाची बाजू घेतली. तर काहींनी, जसं की हाबेल आणि नोहा यांनी यहोवाची बाजू घेतली. बरेच लोक इतकी वाईट कामं करू लागले, की यहोवाने त्या दुष्ट जगाचा नाश केला. या भागात आपण दोन गोष्टी शिकणार आहोत. पहिली म्हणजे, आपण कोणाची बाजू घेतो हे यहोवा पाहतो. आणि दुसरी म्हणजे, तो कधीही वाईट गोष्टीला चांगल्या गोष्टीवर विजयी होऊ देणार नाही.

या विभागात

पाठ ३

आदाम आणि हव्वा यांनी देवाचं ऐकलं नाही

एदेन बागेतलं एक झाड विशेष का होतं? हव्वाने ते फळ का खाल्लं?

पाठ ४

रागामुळे खून झाला

देवाने हाबेलची भेट स्वीकारली, पण काइनची स्वीकारली नाही. काइनला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याला खूप राग आला आणि त्याने खूप चुकीचं काम केलं.

पाठ ५

नोहाचं जहाज

पृथ्वीवर आलेल्या वाईट देवदूतांनी जेव्हा स्त्रियांशी लग्न केलं तेव्हा त्यांना जी मुलं झाली ती खूप शक्‍तिशाली आणि वाईट होती. सगळीकडे हिंसा वाढलेली. पण नोहा वेगळा होता कारण त्याचं यहोवावर प्रेम होतं आणि तो त्याची आज्ञा पाळायचा.

पाठ ६

आठ जण वाचतात

जलप्रलयात ४० दिवस आणि ४० रात्र पाऊस पडला. नोहा जहाजात त्याच्या कुटुंबासोबत एका वर्षापेक्षा जास्त काळ राहिला. शेवटी ते बाहेर येऊ शकले.