व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ५ ची प्रस्तावना

भाग ५ ची प्रस्तावना

लाल समुद्र पार केल्याच्या दोन महिन्यांनंतर इस्राएली लोक सीनाय डोंगराजवळ पोचले. तिथे यहोवाने इस्राएली लोकांसोबत एक करार केला. त्याने त्यांना एक खास राष्ट्र म्हणून निवडलं. त्याने नेहमी त्यांना सुरक्षित ठेवलं. त्यांना गरजेच्या सर्व वस्तू पुरवल्या. जसं की, खाण्यासाठी मान्‍ना दिला, तंबू बांधून राहण्यासाठी सुरक्षित जागा दिल्या. शिवाय, त्यांचे कपडेही खराब झाले नाहीत. पण, यहोवाने इस्राएली लोकांना नियमशास्त्र का दिलं? आणि त्याने निवासमंडपाची व याजकांची व्यवस्था का केली? या प्रश्‍नांची उत्तरं आपल्या मुलांना समजावून सांगा. आपण नेहमी दिलेला शब्द पाळण्याची, नम्र राहण्याची आणि यहोवाला विश्‍वासू राहण्याची गरज का आहे, याच्या महत्त्वावर जोर द्या.

या विभागात

पाठ २३

इस्राएली लोकांनी यहोवाला वचन दिलं

सीनाय पर्वताजवळ इस्राएली लोक जेव्हा तंबू बांधून राहत होते, तेव्हा त्यांनी यहोवाला एक खास वचन दिलं.

पाठ २४

त्यांनी आपलं वचन पाळलं नाही

मोशे दहा आज्ञा घेऊन येईपर्यंत लोकांनी एक गंभीर पाप केलं.

पाठ २५

उपासनेसाठी निवासमंडप

या खास तंबूमध्ये कराराचा कोश ठेवण्यात आला होता.

पाठ २६

बारा गुप्तहेर

कनान देशाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या इतर दहा गुप्तहेरांपेक्षा यहोशवा आणि कालेब वेगळे होते.

पाठ २७

त्यांनी यहोवाविरुद्ध बंड केलं

कोरह, दाथान, अबीराम आणि इतर २५० व्यक्‍तींनी यहोवाविषयी महत्त्वपूर्ण गोष्ट समजून घेतली नाही.

पाठ २८

बलामची गाढवी बोलते

बालामला ज्याला पाहू शकत नव्हता त्याला त्याच्या गाढवीने पाहिलं.