व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ६ ची प्रस्तावना

भाग ६ ची प्रस्तावना

इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात पोचले, तेव्हा निवासमंडप खऱ्‍या उपासनेचं मुख्य केंद्र बनला. याजक, लोकांना नियमशास्त्र शिकवायचे आणि न्यायाधीश राष्ट्राचं मार्गदर्शन करायचे. प्रत्येक इस्राएली व्यक्‍तीला यहोवाला आणि इतरांना विश्‍वासू राहण्याची गरज होती. या भागात आपण पाहणार आहोत, की एका व्यक्‍तीच्या निर्णयांचा आणि कामांचा इतरांवर कशा प्रकारे जबरदस्त प्रभाव पडू शकतो? तुम्हाला मुलं असतील तर त्यांना शिकवताना यावर जोर द्या, की दबोरा, नामी, यहोशवा, हन्‍ना, इफ्ताहची मुलगी या सर्वांचा त्यांच्या समाजावर कसा प्रभाव पडला? तसंच, इस्राएली नसलेल्या काही लोकांनी जसं की राहाब, रूथ, याएल आणि गिबोनी लोकांनी, देव इस्राएली लोकांसोबत आहे हे ओळखून त्यांची बाजू कशी घेतली?

या विभागात

पाठ २९

यहोवा यहोशवाला निवडतो

देवाने यहोशवाला ज्या सूचना दिल्या होत्या त्यांचा आपल्यालाही फायदा होऊ शकतो.

पाठ ३०

राहाब गुप्तहेरांना लपवते

यरीहोच्या भिंती कोसळतात पण राहाबचं घर भिंतीवर होतं तरी ते सुरक्षित राहतं.

पाठ ३१

यहोशवा आणि गिबोनी लोक

यहोशवाने देवाला प्रार्थना केली: ‘हे सूर्या तू स्थिर हो!’ देवाने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं का?

पाठ ३२

एक नवीन मार्गदर्शक आणि दोन धाडसी स्त्रिया

यहोशवाच्या मृत्यूनंतर इस्राएली लोक मूर्तींची उपासना करू लागले. त्यांचं जीवन खडतर झालं. पण शास्ता बाराक, दबोरा संदेष्ट्री आणि याएलचा तंबूचा मेख यांमुळे इस्राएली लोकांना मदत झाली.

पाठ ३३

रूथ आणि नामी

दोन विधवा स्त्रिया इस्राएल देशात परत येतात. त्यातली एक स्त्री रूथ, शेतात काम करायला जाते. तिथे बवाज तिला पाहतो.

पाठ ३४

गिदोन मिद्यानी लोकांना हरवतो

मिद्यानी लोकांनी इस्राएली लोकांना खूप त्रास दिला, तेव्हा इस्राएली लोकांनी यहोवाकडे मदतीसाठी विनंती केली. १,३५,००० शत्रू सैनिकांवर गिदोनची छोटी सेना विजय कसा मिळवणार होती?

पाठ ३५

हन्‍ना प्रार्थनेत देवाकडे मुलगा मागते

हन्‍ना, पनिन्‍ना आणि मुलांना घेऊन एलकाना शिलोमध्ये असलेल्या निवासमंडपात उपासना करण्यासाठी जातो. तिथे हन्‍ना प्रार्थनेत देवाकडे मुलगा मागते. यानंतर एका वर्षातच शमुवेलचा जन्म होतो!

पाठ ३६

इफ्ताहचं वचन

इफ्ताहने कोणतं वचन दिलं आणि का? आपल्या वडिलांनी दिलेल्या वचनाबद्दल त्याच्या मुलीची प्रतिक्रिया काय होती?

पाठ ३७

यहोवा शमुवेलशी बोलतो

महायाजक एलीचे दोन मुलगे निवासमंडपात याजक म्हणून काम करायचे. पण त्यांनी देवाचे नियम मोडले. शमुवेल लहान होता आणि तो त्यांच्यासारखा नव्हता. एका रात्री यहोवा शमुवेलशी बोलतो.

पाठ ३८

यहोवा शमशोनला शक्‍तिशाली बनवतो

पलिष्टी लोकांसोबत लढण्यासाठी यहोवा देवाने शमशोनला ताकद दिली. पण शमशोनने चुकीचा निर्णय घेतला आणि त्यामुळे पलिष्टी लोकांनी त्याला पकडलं.