व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ७ ची प्रस्तावना

भाग ७ ची प्रस्तावना

या भागात आपल्याला शौल आणि दावीद या दोन्ही राजांचा इतिहास वाचायला मिळतो. हा इतिहास जवळजवळ ८० वर्षांचा आहे. सुरुवातीला शौल नम्र होता आणि देवाला भिऊन वागायचा. पण, नंतर तो बदलला आणि यहोवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालण्याचं त्याने सोडून दिलं. त्यामुळे यहोवाने त्याला नाकारलं. काही काळातच यहोवाने शमुवेलला सांगितलं, की त्याने दावीदला इस्राएलचा नवीन राजा म्हणून निवडावं. यामुळे शौल दावीदवर जळू लागला. त्याने त्याला मारून टाकण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. पण, दावीदने मात्र कधीही बदला घेतला नाही. दावीदला यहोवाने निवडलं आहे हे शौलच्या मुलाला, म्हणजे योनाथानला माहीत होतं. म्हणून तो दावीदला विश्‍वासू राहिला. दावीदच्या हातून काही गंभीर पापं घडली. पण, त्याने यहोवाकडून मिळणारं ताडन नेहमी स्वीकारलं. तुम्हाला मुलं असतील तर त्यांना हे समजण्यासाठी मदत करा, की यहोवाचं ऐकणं किती महत्त्वाचं आहे. तसंच, आपलं मार्गदर्शन करण्यासाठी त्याने ज्यांना निवडलं आहे त्यांचंही आपण नेहमी ऐकलं पाहिजे.

या विभागात

पाठ ३९

इस्राएलचा पहिला राजा

देवाने इस्राएली लोकांचं मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना न्यायाधीश दिले होते. पण, त्यांना राजा हवा होता. शमुवेलने शौलला पहिला राजा म्हणून नियुक्‍त केलं. पण, नंतर यहोवाने शौलचा त्याग का केला?

पाठ ४०

दावीद आणि गल्याथ

यहोवा दावीदला इस्राएलचा नवीन राजा होण्यासाठी निवडतो. दावीदची निवड योग्य का होती हे दावीद दाखवून देतो.

पाठ ४१

दावीद आणि शौल

यांच्यापैकी एक दुसऱ्‍याचा द्वेष का करतो? ज्याचा द्वेष केला जात आहे तो कसा वागतो?

पाठ ४२

धाडसी आणि विश्‍वासू योनाथान

राजाचा मुलगा दावीदचा चांगला मित्र बनतो

पाठ ४३

दावीद राजाच्या हातून घडलेलं पाप

एका चुकीच्या निर्णयामुळे खूप समस्या निर्माण होऊ शकतात.