व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ८ ची प्रस्तावना

भाग ८ ची प्रस्तावना

यहोवाने शलमोनला आशीर्वाद दिला. त्याने त्याला खूप बुद्धी दिली. तसंच, मंदिर बांधायचा बहुमानसुद्धा दिला. पण तो हळूहळू यहोवापासून दूर गेला आणि त्याने यहोवाला सोडून दिलं. तुम्हाला मुलं असतील तर आपल्या त्यांना हे समजण्यासाठी मदत करा, की खोट्या उपासकांनी कशा प्रकारे शलमोनला देवापासून दूर नेलं. नंतर इस्राएल राज्याचे दोन भाग झाले. वाईट राजांनी लोकांना धर्मत्यागाकडे आणि मूर्तिपूजेकडे नेलं. या काळात, यहोवाच्या कित्येक विश्‍वासू संदेष्ट्यांचा छळ करण्यात आला आणि त्यांना मारूनसुद्धा टाकण्यात आलं. ईजबेल राणीने उत्तरेकडच्या राज्यात चाललेला धर्मत्याग आणखीनच वाढवला. इस्राएल राष्ट्राच्या इतिहासातला हा सर्वात वाईट काळ होता. पण इस्राएली लोकांमध्ये यहोशाफाट राजा आणि एलीया संदेष्टा यांच्यासारखे यहोवाला विश्‍वासू असलेले अजूनही बरेच सेवक होते.

या विभागात

पाठ ४४

यहोवासाठी एक मंदिर

देव शलमोन राजाची विनंती ऐकतो आणि त्याला अनेक बहुमान देतो.

पाठ ४५

राज्याचे दोन भाग होतात

अनेक इस्राएली लोकांनी यहोवाची उपासना करण्याचं सोडून दिलं.

पाठ ४६

कर्मेल डोंगरावर घडलेली परीक्षा

खरा देव कोण आहे? यहोवा की बआल?

पाठ ४७

यहोवा एलीयाची हिंमत वाढवतो

तो तुझीही हिंमत वाढवेल असं तुला वाटतं का?

पाठ ४८

एका विधवेचा मुलगा जिवंत होतो

एकाच घरात दोन चमत्कार

पाठ ४९

एका दुष्ट राणीला शिक्षा होते

ईजबेल एका इस्राएली माणसाचा, नाबोथचा द्राक्षाचा मळा मिळवण्यासाठी त्याला मारण्याचा कट रचते. पण तिचा दुष्टपणा व तिने केलेला अन्याय यहोवापासून लपून राहत नाही.

पाठ ५०

यहोवा यहोशाफाटच्या बाजूने लढतो

शत्रू राष्ट्रं जेव्हा यहूदावर हल्ला करायला आले, तेव्हा यहोशाफाट राजाने देवाला प्रार्थना केली