व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग १० ची प्रस्तावना

भाग १० ची प्रस्तावना

यहोवाला सर्व गोष्टींवर अधिकार आहे. तो महान राजा आहे. सुरुवातीपासून त्याचा सर्व गोष्टींवर अधिकार होता आणि पुढेही राहील. उदाहरणार्थ, यिर्मयाचा जीव घेण्यासाठी त्याला एका विहिरीत टाकून देण्यात आलं, तेव्हा यहोवाने त्याला वाचवलं. त्याने शद्रख, मेशख, अबेद्‌नगो यांना आगीच्या भट्टीतून आणि दानीएलला सिंहांपासून वाचवलं. तसंच, यहोवाने एस्तेरचं रक्षण केलं. यामुळे ती पूर्ण राष्ट्राला वाचवू शकली. यहोवा दुष्टतेला नेहमीसाठी राहू देणार नाही. भव्य पुतळ्याच्या आणि मोठ्या झाडाच्या भविष्यवाणीवरून आपल्याला खात्री मिळते, की देवाचं राज्य लवकरच सर्व वाईट गोष्टींना काढून टाकेल आणि या पृथ्वीवर राज्य करेल.

या विभागात

पाठ ५७

यहोवा यिर्मयाला प्रचार करायला पाठवतो

तरुण संदेष्टा जे बोलला ते ऐकून यहूदाच्या प्रमुखांना खूप राग आला.

पाठ ५८

यरुशलेमचा नाश होतो

यहूदा आणि यरुशलेमचे लोक खोट्या देवांची उपासना करत असल्यामुळे यहोवाने त्यांचा त्याग केला.

पाठ ५९

चार मुलं यहोवाला विश्‍वासू राहतात

बाबेलच्या राजदरबारात असतानाही तरुण यहुदी मुलांचा यहोवाला विश्‍वासू राहण्याचा पक्का निर्धार आहे.

पाठ ६०

नेहमीसाठी टिकणारं राज्य

नबुखद्‌नेस्सरला पडलेल्या अगदी वेगळ्या स्वप्नाचा अर्थ दानीएल समजावून सांगतो.

पाठ ६१

ते मूर्तीपुढे झुकले नाहीत

बाबेलच्या राजाने तयार केलेल्या सोन्याच्या मूर्तीची उपासना करण्यासाठी शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगो तयार होत नाहीत.

पाठ ६२

मोठ्या झाडासारखं एक राज्य

नबुखद्‌नेस्सरला त्याच्या स्वतःच्या भविष्याबद्दलचं स्वप्न पडलं.

पाठ ६३

भिंतीवरचे शब्द

भिंतीवर हे अगदी वेगळे शब्द केव्हा दिसू लागतात आणि त्यांचा काय अर्थ आहे?

पाठ ६४

सिंहांच्या गुहेत दानीएल!

दानीएलसारखं यहोवाला दररोज प्रार्थना करा!

पाठ ६५

एस्तेर आपल्या लोकांचा जीव वाचवते

ती अनाथ होती व दुसऱ्‍या देशातली होती तरी ती राणी बनली.

पाठ ६६

एज्राने लोकांना देवाचे नियम शिकवले

एज्राचं ऐकल्यानंतर इस्राएली लोकांनी देवाला एक खास वचन दिलं.

पाठ ६७

यरुशलेमच्या भिंती

शत्रू आपल्यावर हल्ला करण्यासाठी कट रचत आहेत ही गोष्ट नहेम्याला समजली. मग तो का घाबरला नाही?