व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ११ ची प्रस्तावना

भाग ११ ची प्रस्तावना

या भागापासून ख्रिस्ती ग्रीक शास्त्राची सुरुवात होते. लहानशा शहरात राहणाऱ्‍या एका गरीब कुटुंबात येशूचा जन्म झाला. येशूचे वडील सुतार होते आणि येशू त्यांच्यासोबत काम करायचा. पुढे जाऊन येशू मानवजातीला वाचवणार होता. यहोवाने त्याला स्वर्गातल्या राज्याचा राजा म्हणून निवडलं होतं. तुम्हाला मुलं असतील तर त्यांना पुढील गोष्टी शिकण्यासाठी मदत करा: चांगलं वातावरण मिळेल अशा कुटुंबाची निवड करून यहोवाने येशूची काळजी कशी घेतली? यहोवाने येशूला हेरोद राजापासून कसं वाचवलं आणि त्याचा उद्देश कसा नेहमी पूर्ण होतो? योहानला निवडून यहोवाने येशूसाठी मार्ग कसा तयार केला? तसंच, लहानपणापासूनच येशूला देवाचं मार्गदर्शन आवडायचं हे त्याने कसं दाखवलं?

या विभागात

पाठ ६८

अलीशिबाला बाळ होतं

अलीशिबाच्या पतीला असं का सांगण्यात आलं, की तिच्या बाळाचा जन्म होईपर्यंत तिच्या पतीला बोलता येणार नाही?

पाठ ६९

गब्रीएल मरीयाला भेटायला येतो

त्याने तिला असा एक संदेश दिला ज्यामुळे तिचं जीवन बदलून गेलं.

पाठ ७०

देवदूत येशूच्या जन्माबद्दल घोषणा करतात

ज्या मेंढपाळांनी घोषणा ऐकली त्यांनी लगेच प्रतिक्रिया दाखवली.

पाठ ७१

यहोवाने येशूचं रक्षण केलं

एका दुष्ट राजाला येशूला मारून टाकायचं होतं.

पाठ ७२

येशूचं बालपण

मंदिरात येशूने शिक्षकांना आश्‍चर्यचकित कसं केलं?

पाठ ७३

योहान मार्ग तयार करतो

योहान मोठा झाल्यावर संदेष्टा बनतो. मसीहा येणार असं तो शिकवतो. लोकांनी त्याच्या संदेशाप्रती कशी प्रतिक्रिया दाखवली?