व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग १२ ची प्रस्तावना

भाग १२ ची प्रस्तावना

येशूने लोकांना स्वर्गातल्या राज्याबद्दल शिकवलं. देवाचं नाव पवित्र होण्यासाठी, त्याचं राज्य येण्यासाठी आणि त्याची इच्छा पृथ्वीवर पूर्ण होण्यासाठी येशूने लोकांना प्रार्थना करायला शिकवलं. तुम्हाला जर मुलं असतील तर या प्रार्थनेचा आपल्यासाठी काय अर्थ होतो, हे त्यांना समजावून सांगा. सैतानाने प्रयत्न करूनसुद्धा येशूने एकनिष्ठा टिकवून ठेवली. येशूने आपल्या प्रेषितांना निवडलं आणि देवाच्या राज्याचे सदस्य म्हणून त्यांना काही खास जबाबदाऱ्‍या दिल्या. खऱ्‍या उपासनेसाठी असलेल्या येशूच्या आवेशाबद्दल विचार करा. येशूला लोकांना मदत करायची होती. यामुळे त्याने आजारी लोकांना बरं केलं, उपाशी लोकांना जेवू घातलं, आणि मेलेल्या लोकांनासुद्धा जिवंत केलं. देवाचं राज्य मानवांसाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी करेल, हे दाखवण्यासाठी येशूने हे सर्व चमत्कार केले.

या विभागात

पाठ ७४

येशू मसीहा बनतो

येशू देवाचा कोकरा आहे असं जे योहानने म्हटलं, त्याचा काय अर्थ होतो?

पाठ ७५

सैतान येशूची परीक्षा घेतो

सैतान तीन वेळा येशूची परीक्षा घेतो. त्या तीन परीक्षा कोणत्या होत्या? येशूने काय उत्तर दिलं?

पाठ ७६

येशू मंदिर शुद्ध करतो

येशू मंदिरातून प्राण्यांना बाहेर का हाकलतो आणि पैसे बदलून देणाऱ्‍यांचे टेबल का उलटून टाकले?

पाठ ७७

विहिरीवर आलेली स्त्री

एका शोमरोनी स्त्रीशी जेव्हा येशू बोलला तेव्हा तिला आश्‍चर्य का वाटलं? येशूने तिला अशी कोणती गोष्ट सांगितली जी याआधी त्याने कोणालाही सांगितली नव्हती?

पाठ ७८

येशू राज्याचा संदेश घोषित करतो

येशू त्याच्या काही शिष्यांना “माणसं धरणारे” बनण्याचं आमंत्रण देतो. त्यानंतर तो त्याच्या ७० शिष्यांना आनंदाचा संदेश घोषित करण्याचं प्रशिक्षण देतो.

पाठ ७९

येशू अनेक चमत्कार करतो

तो जिथे कुठे जातो तिथे आजारी लोक त्याच्याकडे मदतीसाठी येतात आणि तो त्यांना बरं करतो. तो एका लहान मुलीलासुद्धा जिवंत करतो.

पाठ ८०

येशू बारा प्रेषित निवडतो

येशू त्यांची निवड कशासाठी करतो? त्यांची नावं तुम्हाला आठवतात का?

पाठ ८१

डोंगरावरचा उपदेश

जमा झालेल्या लोकांच्या समुदायाला येशू मौल्यवान धडे शिकवतो.

पाठ ८२

येशू शिष्यांना प्रार्थना करायला शिकवतो

येशूने आपल्या शिष्यांना कोणत्या गोष्टी मागत राहण्याविषयी सांगितलं?

पाठ ८३

येशू हजारो लोकांना जेवू घालतो

या चमत्कारावरून आपल्याला येशू आणि यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?

पाठ ८४

येशू पाण्यावर चालतो

प्रेषितांनी जेव्हा चमत्कार पाहिला तेव्हा त्यांना कसं वाटलं असेल? तुला काय वाटतं?

पाठ ८५

येशू शब्बाथाच्या दिवशी आजार बरा करतो

येशू जे करत आहे, त्यासाठी सर्व जण खूश का नाहीत?

पाठ ८६

येशू लाजरचं पुनरुत्थान करतो

येशू मरीयाला रडताना पाहतो तेव्हा तोही रडू लागतो. पण, लवकरच त्यांचे दुःखाने वाहत असलेले अश्रूचं आनंदाश्रूत परिवर्तन होतं.