व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग १४ ची प्रस्तावना

भाग १४ ची प्रस्तावना

सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांनी राज्याचा आनंदाचा संदेश पृथ्वीवर अगदी दूरपर्यंत घोषित केला. त्यांनी कुठे प्रचार केला पाहिजे याचं निर्देशन येशूने त्यांना दिलं. तसंच, लोकांना आपापल्या भाषेत शिकवण्यासाठी येशूने चमत्कारिक रीत्या त्यांना मदतही केली. यहोवाने त्यांना धैर्य दाखवण्यासाठी मदत केली. तसंच, तीव्र विरोधाचा सामना करण्यासाठी लागणारी शक्‍तीही त्यांना दिली.

येशूने प्रेषित योहानला एका दृष्टान्तात यहोवाचं वैभव दाखवलं. तसंच, आणखी एका दृष्टान्तात त्याने पाहिलं की स्वर्गाच्या राज्याने सैतानावर विजय मिळवून त्याची सत्ता कायमची मिटवून टाकली आहे. शिवाय, येशू राजा या नात्याने राज्य करत आहे आणि त्याच्यासोबत १,४४,००० सहराजे आहेत हेही त्याने पाहिलं. संपूर्ण पृथ्वी नंदनवन बनली आहे आणि सर्व लोक शांतीने आणि एकतेने यहोवाची उपासना करत आहेत हेसुद्धा त्याने पाहिलं.

या विभागात

पाठ ९४

शिष्यांना पवित्र आत्मा मिळतो

पवित्र आत्मा चमत्कारिक रीत्या त्यांना काय करण्याची शक्‍ती देतो?

पाठ ९५

कोणतीच गोष्ट त्यांना थांबवू शकत नव्हती

ज्या धर्मगुरूंनी येशूला मारून टाकलं होतं त्यांना आता त्याच्या शिष्यांची तोंडं बंद करायची होती. पण ते तसं करू शकले नाहीत.

पाठ ९६

येशू शौलला निवडतो

शौल ख्रिस्ती लोकांचा कट्टर विरोधी होता. पण तो लवकरच बदलणार होता.

पाठ ९७

कर्नेल्यला पवित्र आत्मा मिळतो

देवाने पेत्रला यहुदी नसलेल्या माणसाच्या घरी जायला का सांगितलं?

पाठ ९८

ख्रिस्ती धर्म अनेक देशांत पसरतो

प्रेषित पौल आणि त्याचे मिशनरी सोबती दूरदूरच्या देशांमध्ये प्रचार करतात.

पाठ ९९

जेलचा अधिकारी ख्रिस्ती बनतो

पौल आणि सीला यांना जेलमध्ये का टाकण्यात आलं? जेलचा अधिकारी ख्रिस्ती कसा बनला?

पाठ १००

पौल आणि तीमथ्य

या दोघांनी अनेक वर्षांसाठी मित्र आणि सेवक म्हणून एकत्र काम केलं.

पाठ १०१

पौलला रोमला पाठवण्यात येतं

प्रवास खूप कठीण आणि धोक्याचा असला, तरी या प्रेषिताला कोणीही थांबवू शकत नाही.

पाठ १०२

योहानने पाहिलेले दृष्टान्त

येशू त्याला भविष्याबद्दल एका नंतर एक दृष्टान्त दाखवतो.

पाठ १०३

“तुझं राज्य येवो”

देवाचं राज्य पृथ्वीवर मानवांचं जीवन कसं बदलेल हे योहानने दृष्टान्तात पाहिलं.