व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट १क

उपासना म्हणजे काय?

उपासना म्हणजे काय?

उपासनेचा अर्थ “देवाचा आदर आणि त्याच्यावर प्रेम करणं” असा आहे. बायबलमध्ये उपासनेसाठी मूळ भाषेत जे शब्द वापरण्यात आले आहेत, त्यांचा अर्थ, एखाद्याला मनापासून आदर दाखवणं किंवा त्याच्या अधीन राहणं असा होऊ शकतो. (मत्त. २८:९) तसंच, देवाची किंवा एखाद्या दैवताची भक्‍ती किंवा पूजाअर्चा करणं असाही त्यांचा अर्थ होऊ शकतो. (योहा. ४:२३, २४) बायबलमध्ये हे शब्द नेमके कोणत्या अर्थाने वापरले आहेत हे मागच्या-पुढच्या माहितीवरून कळतं.

यहोवा निर्माणकर्ता आणि सर्वोच्च अधिकारी असल्यामुळे त्यालाच आपली भक्‍ती मिळाली पाहिजे. (प्रकटी. ४:१०, ११) यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचा आदर करून आणि त्याच्या नावाचा गौरव करून आपण त्याची उपासना करतो. (स्तो. ८६:९; मत्त. ६:९, १०) यहोवाचा सर्वोच्च अधिकार आणि त्याचं नाव या दोन विषयांबद्दल यहेज्केलच्या पुस्तकात खूप वेळा उल्लेख केला आहे. यहेज्केलच्या पुस्तकातच “सर्वोच्च प्रभू यहोवा” हे शब्द २१७ वेळा आले आहेत. तसंच, “तुम्हाला समजेल की मी यहोवा आहे” हे शब्द वेगवेगळ्या रूपात ५५ वेळा आले आहेत.—यहे. २:४; ६:७.

आपली उपासना फक्‍त श्रद्धा किंवा भावना नाही. ती आपल्या कामांतूनही दिसून आली पाहिजे, तरच ती खरी उपासना असेल. (याको. २:२६) जेव्हा आपण आपलं जीवन यहोवाला समर्पित करतो, तेव्हा त्याला असं वचन देत असतो, की जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत आपण त्याला आपला सर्वोच्च अधिकारी मानून त्याच्या आज्ञा पाळू आणि त्याच्या नावाचा मनापासून आदर करू. येशूने तिसऱ्‍या परीक्षेच्या वेळी सैतानाला जे म्हटलं त्यावरून कळतं, की उपासनेत ‘पवित्र सेवाही’ सामील आहे. (मत्त. ४:१०) आपण यहोवाचे उपासक असल्यामुळे आपल्याला त्याची मनापासून सेवा करावीशी वाटते. a (अनु. १०:१२) आपण उपासनेच्या कामांमध्ये भाग घेतो आणि त्यांसाठी त्याग करतो तेव्हा खरंतर आपण यहोवाची पवित्र सेवाच करत असतो. पण पवित्र सेवेत कोणकोणती कामं येतात?

आपण पवित्र सेवा वेगवेगळ्या मार्गांनी करू शकतो आणि यहोवा त्या सगळ्यांची कदर करतो. जसं, की प्रचार करणं, सभांमध्ये भाग घेणं आणि बांधकाम प्रकल्पांमध्ये भाग घेणं. याशिवाय, आपण कौटुंबिक उपासना करतो, विपत्ती मदतकार्याला हातभार लावतो, अधिवेशनांत काम करायला पुढे येतो किंवा बेथेलमध्ये सेवा करतो तेव्हासुद्धा आपण पवित्र सेवा करत असतो. (इब्री. १३:१६; याको. १:२७) आपण जर शुद्ध उपासनेला जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व दिलं, तर एका अर्थी आपण यहोवाची ‘रात्रंदिवस पवित्र सेवा’ करत असू. खरंच, आपला देव यहोवा याची उपासना केल्यामुळे आपल्याला खूप आनंद मिळतो!—प्रकटी. ७:१५.

अध्याय १, परिच्छेद ९ वर परत जाण्यासाठी

a उपासनेसाठी असलेल्या एका हिब्रू शब्दाचा अर्थ “सेवा” असाही होऊ शकतो. यावरून कळतं, की उपासनेत सेवा करणंही सामील आहे.—निर्ग. ३:१२, तळटीप.