व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट १ख

यहेज्केल पुस्तकाची झलक

यहेज्केल पुस्तकाची झलक

यहेज्केल पुस्तकाची रचना अशी आहे:

अध्याय १ ते ३

यहेज्केल बाबेलच्या बंदिवासात असलेल्या यहुदी लोकांसोबत राहत होता. इ.स.पू. ६१३ मध्ये यहोवा त्याला अनेक दृष्टान्त दाखवतो आणि त्याला खबार नदीच्या किनाऱ्‍यावर राहणाऱ्‍या यहुद्यांना भविष्यावाणी सांगायचं कामही देतो.

अध्याय ४ ते २४

इ.स.पू. ६१३ ते ६०९ या काळात यहेज्केल अनेक भविष्यवाण्या सांगतो. त्या खासकरून यरुशलेम आणि तिथल्या बंडखोर, मूर्तिपूजक लोकांवर येणाऱ्‍या न्यायदंडाबद्दल होत्या.

अध्याय २५ ते ३२

इ.स.पू. ६०९ मध्ये बाबेलचे लोक यरुशलेमला शेवटचा वेढा घालतात. त्या वर्षापासून यहेज्केल यरुशलेमबद्दल न्यायदंडाचा संदेश सांगायचं बंद करतो आणि आजूबाजूच्या शत्रू राष्ट्रांबद्दल न्यायदंडाचा संदेश सांगू लागतो. ती राष्ट्रं म्हणजे अम्मोन, अदोम, इजिप्त, पलेशेथ, सीदोन आणि सोर.

अध्याय ३३ ते ४८

इ.स.पू. ६०६ पासून यरुशलेम आणि तिथलं मंदिर उद्ध्‌वस्त अवस्थेत पडून होतं. यहेज्केल तिथून मैलो दूर बाबेलमध्ये असला, तरी यहोवाची शुद्ध उपासना पुन्हा सुरू होईल हा आशेचा संदेश तो सांगतो.

यहेज्केल पुस्तकात, ज्या क्रमाने घटना घडल्या आहेत त्याच क्रमाने आणि विषयाप्रमाणे त्या मांडल्या आहेत. आधी यरुशलेम आणि तिथल्या मंदिराच्या नाशाबद्दलच्या भविष्यवाण्या दिल्या आहेत. आणि त्यानंतर शुद्ध उपासना पुन्हा कशी सुरू होईल त्याबद्दल अनेक भविष्यवाण्या दिल्या आहेत. हा योग्यच क्रम आहे, कारण मंदिरात शुद्ध उपासना बंद झाल्यामुळेच ती पुन्हा सुरू होण्यासाठी भविष्यवाण्या कराव्या लागल्या.

यासोबतच, यहेज्केलने शत्रू राष्ट्रांविरुद्ध केलेल्या भविष्यवाण्या (अध्याय २५ ते ३२) या यरुशलेमच्या नाशाच्या भविष्यवाण्यांनंतर आणि शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याच्या भविष्यवाण्यांआधी दिल्या आहेत. यहेज्केलने शत्रू राष्ट्रांविरुद्ध दिलेल्या न्यायाच्या संदेशांबद्दल एक विद्वान म्हणतात: “यहेज्केलने आधी अशी भविष्यवाणी केली, की यहोवाचा क्रोध त्याच्या लोकांवर भडकेल. मग, तो शत्रू राष्ट्रांना शिक्षा करेल आणि शेवटी आपल्या लोकांना दया दाखवेल हे त्याने सांगितलं. हा योग्यच क्रम होता असं म्हणता येईल, कारण यहोवाने आपल्या लोकांना दया दाखवून त्यांना बंदिवासातून सोडवण्याआधी त्यांच्या शत्रूंचा नाश करणं गरजेचं होतं.”

अध्याय १, परिच्छेद १८ वर परत जाण्यासाठी