व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट २क

यहेज्केलच्या भविष्यवाण्या समजून घेणं

यहेज्केलच्या भविष्यवाण्या समजून घेणं

भविष्यवाणी म्हणजे काय?

बायबलमध्ये नावा या हिब्रू क्रियापदाचं भाषांतर “भविष्यवाणी” असं करण्यात आलं आहे. हा शब्द खासकरून, देवाकडून मिळालेल्या संदेशाला, न्यायदंडाला, नैतिक शिक्षणाला किंवा आज्ञेला सूचित करतो. तसंच, पुढे जे घडणार आहे त्याबद्दल असलेला देवाचा संदेश घोषित करण्यालाही हा शब्द सूचित करू शकतो. यहेज्केलच्या पुस्तकात आपल्याला अशा सगळ्या प्रकारच्या भविष्यवाण्या वाचायला मिळतात.—यहे. ३:१०, ११; ११:४-८; १४:६, ७; ३७:९, १०; ३८:१-४.

भविष्यवाण्या कोणत्या रूपात देण्यात आल्या?

  • दृष्टान्त

  • उदाहरणं

  • अभिनय

यहेज्केलच्या पुस्तकातल्या भविष्यवाण्या दृष्टान्ताच्या, उदाहरणाच्या, गोष्टीच्या आणि अभिनयाच्या स्वरूपात देण्यात आल्या आहेत.

भविष्यवाण्या कशा पूर्ण झाल्या?

यहेज्केलच्या पुस्तकातल्या काही भविष्यवाण्यांची पूर्णता एकापेक्षा जास्त वेळा होणार होती. जसं की, देवाचे लोक वचन दिलेल्या देशात परत आले तेव्हा शुद्ध उपासनेबद्दलच्या भविष्यवाण्या काही प्रमाणात पूर्ण झाल्या. पण बऱ्‍याच भविष्यवाण्या आज पूर्ण होत आहेत आणि भविष्यातही पूर्ण होतील. त्याबद्दल आपण या प्रकाशनाच्या ९ व्या अध्यायात पाहणार आहोत.

पूर्वी आपली अशी समज होती की यहेज्केलच्या भविष्यवाण्यांमध्ये दिलेल्या बऱ्‍याच घटना, व्यक्‍ती, ठिकाणं आणि अशा इतर गोष्टी भविष्यात होणाऱ्‍या काही घटनांना किंवा गोष्टींना सूचित करतात. पण या प्रकाशनात तशी माहिती दिलेली नाही. फक्‍त ज्या घटनांबद्दल किंवा गोष्टींबद्दल आपल्याला बायबलमधून स्पष्ट पुरावा मिळतो की त्या भविष्यातल्या एखाद्या गोष्टीला सूचित करतात त्यांबद्दलचीच माहिती या प्रकाशनात दिली आहे. a या प्रकाशनात, यहेज्केलच्या बऱ्‍याचशा भविष्यवाण्या मोठ्या प्रमाणात कशा पूर्ण होतील याबद्दल सांगितलं आहे. तसंच, यहेज्कलच्या पुस्तकात सांगितलेल्या संदेशातून, त्याने उल्लेख केलेल्या लोकांकडून, ठिकाणांवरून आणि घटनांमधून आपल्याला काय शिकायला मिळतं हेही आपण पाहणार आहोत.

अध्याय २, परिच्छेद ३० वर परत जाण्यासाठी

a याबद्दलच्या अधिक माहितीसाठी टेहळणी बुरूज, १५ मार्च २०१५, पृ. ७-११, परि. ७-१२; आणि याच अंकात पृ. १७-१८ वर दिलेला “वाचकांचे प्रश्‍न,” हा लेख पाहा.